पिंपरी-चिंचवडमध्ये घरगुती वादातून एका व्यक्तीने स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ येऊन त्या व्यक्तीचा जीव वाचवला आहे. राहुल सुरेश किमडे अस आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव असून वाकड पोलिसांनी ताब्यात घेऊन समजूत काढली. भाऊ घर नावावर करत नसल्याने अशा प्रकारचे टोकाचे पाऊल उचलत असल्याचं समोर आल आहे. ही घटना मंगळवारी रात्री साडेसातच्या सुमारास घडली.

हेही वाचा – पक्ष्यांनी मेट्रोचा मार्ग अडविला; ओव्हरहेड केबलला धडकल्याने सेवा अर्धा तास खंडित

हेही वाचा – ‘क्यूआर कोड’शिवाय जाहिराती छापणाऱ्या ७४ विकासकांना कारणे दाखवा नोटिसा;पुण्यातील ४९ तर मुंबईतील २५ विकासकांचा समावेश

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल किमडे हे त्यांच्या घरामध्ये अंगावर डिझेल ओतून आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात होते. त्यांच्या हातात माचिसदेखील होते. ते स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्या करणार असल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली. त्या ठिकाणी वाकड पोलिसांना तातडीने जाण्यास सांगितले. तेव्हा, तो व्यक्ती आतून दरवाजा लावून अंगावर डिझेल टाकून बसलेला होता. पोलिसांनी संवादात गुंतवून दुसरीकडे अग्निशमन विभागाला बोलावण्यात आले. काही मिनिटे झाल्यानंतर पोलीस त्याच्याशी बोलत असताना खिडकीतून अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याच्या अंगावर पाण्याचा मारा केला. यामुळे त्या व्यक्तीचा जीव वाचवण्यात पोलिसांना आणि अग्निशमन दलाला यश आले. राहुल यांनी घरगुती कारणातून अशा प्रकारचे टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला होता, अशी माहिती वाकड पोलिसांनी दिली.