पिंपरी- चिंचवड: मित्राच्या मदतीने प्रेयसीने प्रियकराला दगडाने ठेचून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना रविवारी पिंपरी- चिंचवड शहरातील चिखली कुदळवाडी परिसरात घडली आहे. घटनेप्रकरणी प्रेयसीचा मित्र प्रेमदास विठ्ठल चव्हाण याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रेयसीला देखील अटक केली आहे. प्रियकर अब्दुल कलाम हा गंभीर जखमी आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेयसी आणि प्रियकर यांच्यात झालेल्या वादातून प्रेयसीने मित्राच्या मदतीने प्रियकर अब्दुल कलामची दगडाने ठेचून हत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना चिखली कुदळवाडी परिसरात घडली आहे. प्रेयसीचा विवाह झाला असून गंभीर जखमी असलेलां प्रियकर हा तिला पती आणि मुलांना सोडून माझ्याकडे राहण्यास ये असं म्हणायचा. यातून त्यांचं अनेकदा भांडण देखील झालं. याच गोष्टीला कंटाळून तिने मित्राच्या मदतीने प्रियकराला दगडाने ठेचून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. हा व्हिडीओ तिथे उपस्थित असलेल्या व्यक्तीने आपल्या मोबाईल मध्ये कैद केला. तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. घटने प्रकरणी प्रेयसी आणि तिच्या मित्राला चिखली पोलिसांनी अटक केली आहे.