Pimpri Chinchwad Dehu Road Fire: पिंपरी -चिंचवड मधील देहूरोडवरील काही दुकानांमध्ये मध्यरात्री आग लागल्याची घटना घडली आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. आग नेमकं कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे.

हेही वाचा : पिंपरी- चिंचवडमध्ये भाजपला धक्का! भाजपचा नेता बांधणार ठाकरे गटाचे शिवबंधन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देहूरोडवरील आजूबाजूच्या दुकानांना आग लागू नये यासाठी अग्निशमन दल व स्थानिक नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न केले. आगीत कोणतीही जीवीतहानी झाली नाही. आग लागलेल्या दुकानांमध्ये आर्थिक नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.