पिंपरी : महापालिका प्रशासनाची हेल्पलाइन ‘सारथी’ प्रणालीवर गृहनिर्माण सोसायटीधारकांसाठी स्वतंत्र सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे सोसायटीधारक आता तक्रार थेट सारथीवर करू शकणार आहेत. शहरातील सोसायटीधारक अनेक प्रश्नांनी त्रस्त आहेत. अनेक समस्या सातत्याने महापालिका प्रशासनाकडे मांडत आहेत. मात्र, त्यांच्या या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत नव्हता. समस्या निवारणासाठी सारथी प्रणालीमध्ये वेगळी सोय उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार प्रशासनाने सारथी प्रणालीमध्ये सोसायट्यांना स्वतंत्र सुविधा दिली आहे.

हेही वाचा : VIDEO: गोष्ट पुण्याची भाग – ‘गदिमां’च्या सुरेल आठवणी जपणारं त्यांचं निवासस्थान पंचवटी!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्याद्वारे सोसायटीधारक त्यांना भेडसावणाऱ्या समस्या थेटपणे सारथी प्रणालीमध्ये दाखल करू शकणार आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत त्याचे निराकरण केले जाणार आहे.सोसायटीधारकांना त्यांच्या मागण्यांसाठी सातत्याने अर्ज, निवेदने घेऊन पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाकडे जावे लागत होते. त्यामुळे नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत होते. आता अन्य तक्रारींप्रमाणे सारथीवर सोसायटीच्या समस्यांसाठी स्वतंत्र सुविधा दिल्याने नागरिकांची या त्रासातून सुटका होणार आहे.