वादग्रस्त विधान करणाऱ्या मनोहर भिडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी विविध सामाजिक संघटना एकवटल्या आहेत. आज पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयावर या सामाजिक संघटना मोर्चा काढत होत्या. त्या अगोदरच त्यांचा मोर्चा पोलिसांनी काही अंतरावर अडवला. पोलीस आणि आंदोलक समोरीसमोर आलेत.

मनोहर भिडे हे वारंवार महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करत असल्याचे बघायला मिळत आहे. त्यामुळेच आता पिंपरी-चिंचवडमध्ये विविध संघटना एकवटल्या आहेत. भिडेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी त्यांची मागणी आहे. या मोर्चामध्ये पिंपरी-चिंचवडचे सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, मानव कांबळे यांच्यासह मनोज घरबडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

हेही वाचा – सरकारी घोळात घोळ! पुण्याला नवा आरटीओ मिळेना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा – पुणे: प्रवाशांसाठी खूषखबर! मेट्रो स्थानकातून थेट घरापर्यंत आता रिक्षा

सकाळी दळवी नगर या ठिकाणाहून पोलीस आयुक्तालयावर हा मोर्चा धडाडणार होता. त्या अगोदरच पोलिसांनी मोर्चास्थळी दाखल होत तो अडवला. या मोर्चात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांपेक्षा पोलिसांचा फौजफाटा जास्त असल्याचं बघायला मिळत आहे.