करोनाच्या साथीत अनेकांनी आपले आप्तजन गमावले. अनेक मुलांचे आई व बाबा असे दोन्ही या साथीत मरण पावल्याने ते अनाथ झाले असून या मुलांना मदत करण्यासाठी हजारो हात पुढे येत आहेत. पण आईबाबांची छत्रछाया गेल्याचे मोठे दु:ख त्यांना सोसावे लागत आहे. आईवडिलांच्या मृत्यूमुळे या मुलांचा भावनिक आधार गेला असून अनेकांचे आर्थिक पाठबळ कायमचे हिरावले गेले आहे, त्यामुळे त्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोविड-१९मुळे पिंपरी-चिंचवडमधील तीन मुलांनी आपले दोन्ही पालक गमावले आहेत, तर गेल्या वर्षभरात २३३ मुलांनी आई-वडील यापैकी एकाला गमावले आहे. २३३ मुलांपैकी २१२ मुलांच्या वडीलांचा आणि ४१ मुलांच्या आईचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने (पीसीएमसी) केलेल्या सर्वेक्षणात कोविड -१९ मुळे जवळपास २००० महिला विधवा झाल्या आहेत.

“या सर्वेक्षण समितीचे अध्यक्ष असलेले अतिरिक्त नगरपालिका आयुक्त उल्हास जगताप म्हणाले, “जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार समितीची नियुक्ती पीसीएमसी आयुक्तांनी केली होती. आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल पाठविला आहे. जेव्हा आम्हाला अधिक माहिती मिळेल, आम्ही ती अद्ययावत करुन जिल्हाधिकाऱ्यांना पाठवू,”असे ते म्हणाले.

Children orphaned in pandemic : करोनामुळे देशात ३,६२१ बालके अनाथ

“पीसीएमसीमार्फत अनाथ झालेल्या तिन्ही मुलांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. महिला व बालकल्याण विभागाच्या विविध योजनांतर्गत इतर मुलांना मदत करण्यात येणार आहे असे जगताप यांनी सांगितले. महिला व बालकल्याण विभागाच्या कल्याणकारी योजनेंतर्गत विधवा महिलांना एक-वेळ मदत म्हणून १०,००० रुपये देण्यात येणार आहेत. मात्र आम्ही त्यांना २५,००० ते एक लाख रुपये देऊ शकतो का ते पाहण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. आम्हाला यासाठी राज्य सरकारच्या परवानगीची आवश्यकता असेल,” असे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे म्हणाले.

पिंपरी-चिंचवडमध्ये आतापर्यंत २,५३,७१३ जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यातील ४२०८ मृत्यूंपैकी ६० टक्के पुरुष आहेत. पुरुषांमधील मृत्यूचे प्रमाण (दर १०० प्रकरणांमध्ये मृत्यू) १.६० आणि महिलांमध्ये १.३० आहे. “कोविड -१९ मुळे मृत्यू झालेले बहुसंख्य पुरुष ३० पेक्षा अधिक वयोगटातील आहेत. त्यापैकी बरेच विवाहित पुरुष आहेत. आमच्या अंदाजानुसार २००० हून अधिक महिलांनी आपले पती गमावले आहेत,”असे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

करोनामुळे अनाथ झालेल्या बालकांचं अवैध दत्तक जाणं थांबवा: सुप्रीम कोर्टाचं आवाहन

५ ते १२ जून दरम्यान नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक आहे. या काळात सुमारे २६०० रूग्ण बरे झाले, तर १९७० रुग्णांना करोनाची लागण झाली आहे दररोज, आम्ही या महिन्यात ३०० पेक्षा कमी रुग्ण सापडत आहेत. मार्च आणि एप्रिलमध्ये दररोजच्या रुग्णांची संख्या २००० ते ३००० इतकी होती, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pimpri chinchwad three children orphaned by covid19 253 lost one parent abn
First published on: 14-06-2021 at 16:52 IST