पिंपरी : लाडक्या गणरायाची दहा दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर मंगळवारी भक्तीमय वातावरणात निरोप दिला जात आहे. घरगुती गणपती विसर्जनासाठी घाटावर गर्दी झाली आहे. मूर्तीदान उपक्रमाला नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये अद्यापही मोठी गणेश मंडळे विसर्जन मार्गावर आली नाहीत.

पिंपरी आणि चिंचवड परिसरातील गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी विविध घाटांची पाहणी केली. वाल्हेकरवाडी येथील जाधव घाट, चिंचवड येथील बिर्ला पुलाजवळील घाट, पिंपरी येथील सुभाष घाटाचा प्रामुख्याने समावेश होता. मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, विशेष अधिकारी किरण गायकवाड, क्षेत्रीय अधिकारी किशोर ननावरे, कार्यकारी अभियंता नितीन निंबाळकर आदी उपस्थित होते.

हेही वाचा : ‘चिंचवड भाजपमध्ये केवळ घराणेशाही’, माजी नगरसेवकाचा राजीनामा; ‘आणखी १५’…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महापालिकेच्या वतीने सर्व विसर्जन घाटांवर विसर्जन कुंड, निर्माल्य कुंडासह सुरक्षा विषयक सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. पवना धरणातून नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात आला नाही. पवना नदीच्या काठी कृत्रिम विसर्जन हौद उभारण्यात आले आहेत. सुरक्षाकठडे लाऊन नदी परिसर बंद करण्यात आला आहे. दरम्यान, रात्रीचे आठ वाजले तरी मोठी गणेश मंडळे विसर्जन मार्गावर आली नाहीत. दुपारी चार वाजता गिरीजात मित्र मंडळ विसर्जन घाटाकडे रवाना झाले.