पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने १६३७ करोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे शहरातील करोनाबाधितांची एकूण संख्या १ लाख ४० हजार ५८८ एवढी झाली आहे. तर आज दिवसभरात ३६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आज अखेर ३ हजार ३३२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोनावर उपचार घेणार्‍या १६९५ रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर १ लाख १९ हजार ५७७ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली.

पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसभरात १ हजार १५१ रुग्णांची नोंद

पिंपरी-चिंचवडमध्ये आज दिवसभरात १ हजार १५१ करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून ६५ जणांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. तर १ हजार २५० जण करोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील बाधित रुग्णांची एकूण संख्या ७५ हजार २६७ वर पोहचली असून यांपैकी, ६१ हजार ८७० जण करोनातून बरे झाले आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयात उपचार घेण्याऱ्या सक्रिय रुग्णांची संख्या ४ हजार ७७३ एवढी आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune 36 patients died in a day 1673 new cases were found aau
First published on: 26-09-2020 at 20:53 IST