पुणे शहरात दिवसभरात ७७४ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले असुन, दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण बाधितांची संख्या आता २ लाख २ हजार ७०२ वर पोहचली आहे. आतापर्यंत ४ हजार ८५५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान ४२७ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आजअखेर १ लाख ९२ हजार ९२८ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात ४२३ तर महानगरपालिकेच्या हद्दीबाहेरील २ करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, ३१९ जण करोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधित रुग्णांची संख्या १ लाख ५ हजार ७०४ वर पोहचली आहे. यापैकी १ लाख ३९२ जण करोनातून बरे झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ९३६ असल्याची माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune 774 new corona patients were added during the day msr 87 svk 88 kjp
First published on: 28-02-2021 at 20:34 IST