पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये भरसभेत नागरिकांना भावनिक आवाहन केल्याचे बघायला मिळाले. यावर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. अजित पवार अशा पद्धतीने नागरिकांना भावनिक करतील असे वाटले नव्हते. अजित पवार यांनी घेतलेला निर्णय नागरिक आणि पवार कुटुंबीयांना आवडलेला नाही. भाजपला जे जमलं नाही ते अजित पवारांच्या माध्यमातून भाजपने पवार विरुद्ध पवार असा संघर्ष उभा करुन केलं आहे, असेही रोहित पवार म्हणाले. रोहित पवार हे आळंदीत प्रसार माध्यमांशी बोलत होते.
हेही वाचा : करोना अँटीजेन किट गैरव्यवहार प्रकरण : डाॅ. आशिष भारती यांना अटकेपासून दिलासा
रोहित पवार म्हणाले, अजित पवार हे नागरिकांना भावनिक आवाहन करतील अस वाटलं नव्हतं. अजित पवार यांनी घेतलेला निर्णय नागरिकांना आवडलेला नाही. तसेच पवार कुटुंबाला ही पटलेला नाही. अजित पवार हे बोलत असताना म्हणाले की, मी शरद पवार यांचा मुलगा असतो तर वेगळं काहीतरी मिळालं असतं. पुढे ते म्हणाले, महाराष्ट्रातील निर्णय घेण्याची जबाबदारी अजित पवार यांच्यावर होती. त्यांना उपमुख्यमंत्रीपद दिले, असं असताना त्यांना आणखी काय हवं होतं? पदच हवं होतं ना. भाजपकडे जाण्याचं कारण पदच आहे का? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. पुढे ते म्हणाले, जे भाजप ला जमलं नाही. ते अजित पवारांच्या माध्यमातून भाजप करून घेत आहे. पवार विरुद्ध पवार हा संघर्ष जो भाजप उभा करत आहेत. दुर्दैवाने तो अजित पवार यांच्या माध्यमातून शेवटचा प्रयत्न केला जात आहे.