पुणे : येवलेवाडी येथील सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या वसतिगृहात तरूणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अभिषेक प्रवीण शेळके (वय २२, रा. शिर्डी, अहमदनगर) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. अभिषेक हा मूळचा शिर्डी येथील असून, तो पुण्यात शिक्षणासाठी आला होता. अभियांत्रिकीच्या तिसर्‍या वर्षाला तो होता. मंगळवारी तो वसतिगृहातील रूममध्ये एकटाच होता. सायंकाळी त्याचे मित्र परीक्षा देवून वसतिगृहात आले. त्यांनी दरवाजा वाजविल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

Pune Porsche Accident Latest Updates in Marathi
Pune Porsche Accident: अल्पवयीन मुलाची आई कॅमेरासमोर ढसाढसा रडली, म्हणाली; “प्लीज..”
According to Pune police commissioner Amitesh Kumar, it cannot be said the minor boy committed the offence under the influence of alcohol
Pune Porsche Accident: “अल्पवयीन मुलाचा रक्तचाचणी अहवाल महत्त्वाचा नाही, त्याने..”; काय म्हणाले आयुक्त?
pune accident case
Pune Porsche Accident : चालकाचा महत्त्वाचा जबाब; म्हणाला, “अल्पवयीन आरोपीच्या वडिलांनी मला…”
Ravindra Dhangekar on Pune Police Commissioner Amitesh Kumar
“बिल्डर कुटुंबाने पैशांच्या जोरावर गुन्हा पचवला होता, पण…”, आमदार रवींद्र धंगेकरांचा आरोप
Pune Porsche Accident Latest Updates in Marathi
Pune Porsche Accident:अश्विनी आणि अनिश यांना पोर्शने धडक देण्याआधी काय घडलं? डिनर प्लॅन आणि..
What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
Pune Porsche Accident
‘दोन एफआयआर का, गाडीत किती लोक होते, आरोपीला पिझ्झा दिला का?’; पोर्श कार अपघात प्रकरणात पोलीस आयुक्तांची महत्वाची माहिती
yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!

हेही वाचा…Pune Porsche Accident : चालकाचा महत्त्वाचा जबाब; म्हणाला, “अल्पवयीन आरोपीच्या वडिलांनी मला…”

अभिषेकच्या आत्महतेमागचे नेमके कारण समजू शकलेले नाही. मात्र, त्याला काही विषय अवघड गेले होते, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यातूनच त्याने हे पाऊल उचलल्याची शक्यता आहे. कोंढवा पोलीस तपास करत आहेत.