शरद पवार यांची पंतप्रधान दौऱ्यावर टीका

पुणे : काम झालेले नसतानाही मेट्रोचे रविवारी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होत आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधांनाच्या दौऱ्याबाबत टीका केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी (६ मार्च) पुणे दौऱ्यावर येणार आहेत. कर्वे रस्त्यावरील गरवारे महाविद्यालय येथे पुणे मेट्रो मार्गिकेचे उद्घाटन करून ते मेट्रोने आनंदनगपर्यंतचा प्रवास करणार आहेत. त्यानंतर जवळच्या मैदानावरून जाहीर कार्यक्रमाद्वारे ते पुणेकरांना संबोधित करणार आहेत.

पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्यावरून पवार यांनी प्रतिक्रिया दिली. पवार म्हणाले, देशाचे पंतप्रधान या ठिकाणी येत आहेत. त्यांचे काही कार्यक्रम होत असतील तर तक्रार करण्याचे कारण नाही. मेट्रो रेल्वे सुरू करण्यात येणार आहे. एका महिन्यापूर्वी मेट्रोच्या प्रमुखांनी मला मेट्रो दाखवण्यासाठी नेले होते. तेव्हा मेट्रोचे काम पूर्ण झाले नसल्याचे लक्षात आले. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जेथून मेट्रो धावणार आहे तेथून मी प्रवासही केला. त्या वेळी मेट्रोचे काम झालेले नाही हे माझ्या लक्षात आले. काम झालेले नसतानाही उद्घाटन होत आहे. माझी त्याबद्दल काही तक्रार नाही. – शरद पवार