की तोच कित्ता गिरवला जाणार?

पिंपरी- चिंचवड: आयटी हब असलेल्या हिंजवडीची दुरावस्था झाल्याचं बघून आयटी अभियंत्यांनी नुकतीच ‘अनलॉंग हिंजवडी आयटी पार्क’ ही मोहीम राबवली. आयटी पार्कची अवस्था बिकट झाल्याने सह्यांची मोहीम घेण्यात आली. हजारो आयटी अभियंत्यांनी मोहिमेत सहभाग नोंदवला. या सगळ्या प्रयत्नानंतर गुरुवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप, महेश लांडगे, मुळशीचे आमदार शंकर मांडेकर यांच्या उपस्थित बैठक पार पडली.

या बैठकीला ‘अनलॉंग हिंजवडी आयटी पार्क’ मोहिमेतील प्रमुख सात सदस्यांना बोलावण्यात आल होत. सचिन लोंढे यांच्यासह इतर आयटी अभियंते या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी पीएमआरडीए, एमआयडीसी, पीडब्ल्यूडी, पुणे आणि पिंपरी- चिंचवड महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांशी सखोल चर्चा केली. काही अधिकाऱ्यांची आयटी हब पाण्याने तुंबल्याने अजित पवारांनी कानउघडणी केली. देवेंद्र फडणवीस यांनी देखील याबाबत अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केल्याचं बोललं जात आहे.

आमदारांना ही विचारणा करण्यात आली. अद्याप, पिंपरी- चिंचवड महानगर पालिकेत हिंजवडी ग्रामपंचायत समाविष्ट करण्याबाबत सकारात्मक चर्चा झालेली नाही. हिंजवडी आयटी पार्कमध्ये उदभवलेल्या समस्यांमुळे सरकारची बदनामी झाली, हे निश्चितच आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत आक्रमक भूमिका घेऊन हिंजवडी येथे दौरा केला होता. हिंजवडीमधील रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. रस्ता आणि इतर समस्यांवर वेळीच मार्ग काढला नाही, तर आंदोलन करण्यात येईल असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला होता.

दरम्यान, गुरुवारी झालेल्या बैठकीत आयटी अभियंत्यांच्या सात सदस्यीय टीमने समस्यांचा पाढा वाचला. योग्य पावलं उचलून लवकरात लवकर तोडगा काढावा अस म्हणणं त्यांनी मांडल. आयटी अभियंत्यांनी मेट्रो संदर्भात तक्रार केली आहे. मेट्रो स्थानकावर वैक्तिक वाहनांची पार्किंग समस्या आहे. अरुंद रस्ते, ड्रेनेज ची समस्या, मोठा पाऊस झाल्यास हिंजवडीची होणारी कोंडी, रस्त्यालगत पार्किंगची सुविधा, आयटी अभियंते राहत असलेल्या ठिकाणी पाण्याची समस्या, प्रवाश्यांच्या संख्येनुसार मेट्रो वाढवणे या समस्या मांडण्यात आल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सचिन लोंढे यांनी या आधी ही हिंजवडीमधील समस्यांबाबत बोलत आलेले आहेत. २०१८ मध्ये देखील सचिन लोंढे यांनी काही आयटी अभियंत्यांना सोबत घेऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. पण, हिंजवडीच्या समस्यांमध्ये तुसभर सुद्धा सुधारणा झालेली नाही. आता तरी प्रशासन याकडे लक्ष देते का पाहावं लागणार आहे.