मार्केट यार्डातील घाऊक फळबाजारात कोकणातील जांभळांची आवक सुरू झाली आहे. यंदाच्या वर्षी कोकणातील जांभळांची आठ ते दहा दिवस अगोदर सुरु झाली आहे. तळकोकणातील सावंतवाडी, कणकवली भागातील जांभळे रसाळ आणि गोड असून घाऊक बाजारात प्रतिकिलो जांभळांना १५० ते १७० रुपये असा भाव मिळाला असून किरकोळ बाजारात जांभळांचा दर प्रतिकिलो २०० ते २५० रुपयांच्या दरम्यान आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आठवडाभरात कोकणातील जांभळांची आवक आणखी वाढेल. कोकण भागासह कर्नाटक, गुजरात तसेच पुणे जिल्ह्य़ातून जांभळांची आवक होते. पुणे जिल्हा परिसरातील जांभळाच्या तुलनेत कोकणातील जांभळांची आवक लवकर सुरू होते. यंदाच्या वर्षी गुजरातमधील बडोदा जिल्ह्य़ातून जांभळाची आवक गेल्या दीड महिन्यांपासून सुरू झाली आहे. त्यानंतर कोकणातील सावंतवाडी, कणकवली भागातून जांभळांची आवक सुरू झाली आहे.

सध्या बाजारात ६० ते ८० किलो जांभळांची आवक रोज होत आहे. फळबाजारातील विक्रेते प्रकाश घुले आणि शिवाजी भोसले यांच्याकडे जांभळांची आवक झाली. कोकण भागातील जांभळांचा हंगाम एप्रिल ते जूनपर्यंत सुरू असतो.

सध्या कोकणातील जांभळांची आवक तुरळक आहे. पुढील आठवडय़ापासून जांभळांची आवक सुरळीत होईल. कोकणातील जांभळांचा दर्जा चांगला असून ती आकाराने मोठी, रसरशीत आणि चवीला गोड आहेत, अशी माहिती जांभळाचे व्यापारी अजित घुले यांनी दिली.

येत्या काही दिवसात आवक वाढणार

येत्या काही दिवसांत कर्नाटकासह बांदा, बारामती, मुळशी भागातून जांभळांची आवक सुरू होईल. आवक वाढल्यानंतर जांभळांचे भाव थोडे कमी होतील, असे व्यापारी अजित घुले यांनी सांगितले.

 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Java plum in pune market
First published on: 30-03-2019 at 23:54 IST