पुणे : सराफी पेढीच्या भिंतीला भगदाड पाडून चोरट्यांनी पेढीतील तीन लाख ११ हजार रुपयांचे दागिने लांबविल्याची घटना कोंढवा परिसरात घडली. याबाबत सराफ व्यावसायिक मालमसिंह राठोड (वय ४२, रा. शिवशंभोनगर, कात्रज-कोंढवा रस्ता) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राठोड यांचे कोंढव्यातील उंड्री परिसरात न्यू खिमंडे ज्वेलर्स सराफी पेढी आहे. एका शाळेला लागून सराफी पेढी असून शाळा आणि पेढीची भिंत सामायिक आहे. चोरट्यांनी मध्यरात्री शाळेच्या आवरात प्रवेश केला. शाळेतील भिंतीला भगदाड पाडून चोरटे सराफी पेढीत शिरले. पेढीतील सोन्याचे दागिने लांबविण्यात आले. राठोड सकाळी सराफी पेढी उघडण्यासाठी आले. तेव्हा सराफी पेढीच्या भिंतीला भगदाड पाडून चोरी करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला.

चोरट्यांनी पेढीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण साठविणारे डीव्हीआर यंत्र चोरुन नेले. डीव्हीआर यंत्र चोरुन नेण्यात आल्याने पोलिसांना सीसीटीव्ही चित्रीकरण उपलब्ध होऊ शकले नाही. चोरट्यांचा माग काढण्यात येत असून पोलीस उपनिरीक्षक वगरे तपास करत आहेत.

three thousand families staying near waldhuni river boycotting lok sabha election, construction within river bed
कल्याणमध्ये वालधुनी नदी परिसरातील तीन हजार कुटुंबीयांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार
Pimpri road, road development works,
पिंपरी : रस्ते विकासाच्या ९० कोटींच्या कामात ‘रिंग’?
More than 20 thousand farmers objected to MMRDA notification
‘एमएमआरडीए’च्या अधिसूचनेला २० हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या हरकती
pune on nagar road bhivari village robbers threatened with weapons beaten women looted
पुणे : नगर रस्त्यावरील बिवरी गावात दरोडा; महिलांना मारहाण करून १६ लाखांची लूट

भगदाड पाडून चोरीची तिसरी घटना

वारजे भागातील एका सराफी पेढीच्या भिंतीला भगदाड पाडून एक कोटी रुपयांचे दागिने लांबविण्यात आल्याची घटना चार महिन्यांपूर्वी घडली होती. त्यानंतर सोमवार पेठेतील खुराणा मोबाइल शाॅपीच्या भिंतीला भगदाड पाडून चोरट्यांनी ५० लाख रुपयांचे महागडे मोबाइल संच लांबविले होते. कोंढव्यातील सराफी पेढीच्या भिंतीला भगदाड पाडून दागिने लांबविण्यात आले. भिंतीला भगदाड पाडून चोरी करण्याची गेल्या काही महिन्यातील ही तिसरी घटना आहे.