scorecardresearch

Premium

मावळमध्ये राष्ट्रवादीला तीन वेळेस अपयश; काँग्रेसचा मावळ लोकसभा मतदारसंघावर दावा!

मावळ लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसने दावा केला आहे. मावळमध्ये काँग्रेसची ताकद मोठी असून काँग्रेसला मानणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त असल्याचं काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम यांनी म्हटलं आहे.

Kailas Kadam Maval
मावळमध्ये राष्ट्रवादीला तीन वेळेस अपयश; काँग्रेसचा मावळ लोकसभा मतदारसंघावर दावा! (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

मावळ लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसने दावा केला आहे. मावळमध्ये काँग्रेसची ताकद मोठी असून काँग्रेसला मानणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त असल्याचं काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम यांनी म्हटलं आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मावळ लोकसभा मतदारसंघात तीन वेळेस अपयश आलेल आहे. २०१९ मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पार्थ पवार यांचा दारून पराभव झाला होता. हे विसरता कामा नये, असेदेखील कैलास कदम म्हणाले.

सध्या पुणे जिल्ह्यात लोकसभेचे वारे वाहू लागले आहेत. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनीदेखील विधानसभा, महानगरपालिकेपेक्षा सर्वांचा कल लोकसभेच्या निवडणुकीकडेच असल्याचं म्हटलं होतं. दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसने मावळच्या लोकसभा मतदारसंघावर दावा केला आहे. पिंपरी-चिंचवड शहराची जडणघडण काँग्रेसचे स्वर्गीय नेते रामकृष्ण मोरे यांनी केली. शहरात काँग्रेसची पायेमुळे त्यांनीच पसरवली. मूळ मावळ मतदारसंघ हा काँग्रेसचा आहे, असे काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम यांनी म्हणत मावळ लोकसभा मतदारसंघावर दावा केला आहे.

asim sarode on rahul narvekar (1)
“अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य
ajit pawar
‘दादा कचऱ्याची गाडी येत नाही’, भरकार्यक्रमात महिलेची तक्रार, अजित पवारांनी दिलं मिश्किल उत्तर, म्हणाले…
Sharad Pawar NCP
“ते सहसा माझ्या शब्दाला नकार देत नाहीत”; शरद पवारांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा, म्हणाले…
Old Malavani Aaji Writes Letter To Son After Ganpati Visit How Konkan Gets Lonely International Day Of Older Person Emotional
गणपतीला आलेला लेक, सून, नात मुंबईत निघून गेले, आणि मी पुन्हा वेडीच ठरले!

हेही वाचा – मोसमी वारे केरळात; १३ जूनपर्यंत कोकणात

यासंबंधी लवकरच पक्षश्रेष्ठींशी बोलणार असल्याचं त्यांनी म्हटले असून, महाविकास आघाडीतील पक्ष आम्हाला सहकार्य करतील, असं त्यांनी म्हटले आहे. परंतु, मावळ लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीत बिघडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नेमका हा मतदारसंघ कोणाला मिळणार, हेदेखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kailas kadam of congress claims maval lok sabha constituency kjp 91 ssb

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×