आर्थिक फसवणूक प्रकरणी किरण गोसावी अटकेत असून, त्याची साथीदार कुसुम गायकवाड हिला अटक करण्यात लष्कर पोलिसांना यश आले आहे. तिला न्यायालयामध्ये हजर केले असता, तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

नोकरी लावण्याचे आमिष दाखवून किरणे गोसावी याने पुण्यातील कसबा पेठ भागात राहणार्‍या चिन्मय देशमुख या तरुणाची आर्थिक फसवणूक केल्याची घटना २०१८ मध्ये घडली होती. त्या प्रकरणी चिन्मय याने फरासखाना पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर त्याचा शोध सुरू होता.त्याच दरम्यान आर्यन खान ड्रग्स प्रकरणी पंच म्हणून किरण गोसावी राहिला आणि त्यावेळी आर्यन सोबतचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. तो फोटो चिन्मय देशमुख याने पाहताच, त्याने पोलिसाकडे तक्रारी केली व तोच आरोपी असल्याचे सांगितले. त्यानंतर पुन्हा किरण गोसावीचा पोलीस शोध घेत असताना, त्याला कात्रज येथून अटक करण्यात आली. किरण गोसावीला न्यायालया मध्ये हजर केल्यावर वेळोवेळी तपास कामानिमित्त पोलीस कोठडीमध्ये वाढ झाली.

nagpur, truck driver kidnapped minor girl, police, solved case
ट्रक चालकांकडून अल्पवयीन; मुलीचे अपहरण, तीन तासांत छडा
Sharad Pawar On PM Narendra Modi
“पेट्रोलचे दर ५० दिवसात कमी करणार असं मोदी म्हणाले होते, आता तीन हजार दिवस..”, शरद पवारांचा सवाल
Two women arrested for kidnapping six-year-old boy
सहा वर्षांच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या दोन महिलांना अटक; मुलाची सुटका… ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यांद्वारे पोलिसांनी ‘असा’ लावला छडा
Accused kidnap minor girl
अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीला बिहारमध्ये अटक

दरम्यान राज्यातील ९ ठिकाणी किरण गोसावी विरोधात आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातील सुरुवातीला फरासखाना प्रकरण सुरू होतेच, लष्कर आणि वानवडी प्रकरणी यापैकी कोणी तरी किरण गोसावी याचा ताबा घेणार हे निश्चित मानले जात असताना. लष्कर पोलिसांनी त्याचा ताबा घेऊन लष्कर न्यायालयामध्ये हजर केल्यावर त्याला आठ दिवसांची पोलिस सुनावण्यात आली. तर त्याला साथ देणारी महिला कुसुम गायकवाड हिचा शोध सुरू असताना, तिला वाकड येथून अटक करण्यात आली. तिला आज न्यायालयात हजर केल्यावर पोलिसांनी दहा दिवसांच्या कोठडीची मागणी केली. मात्र न्यायालयाने तीन दिवसाची कोठडी सुनावली आहे.