पुण्यातील कोंढवा खुर्द भागातील  इमारतीला एका इमारतीला तडे गेल्याची घटना आज सायंकाळच्या सुमारास घडली. ती इमारत अनाधिकृत असल्याने उद्या पुणे महापालिका इमारत पाडणार असून संबधीतवर कडक कारवाई केली जाणार असल्याचे पुणे महापालिकेकडून सांगण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोंढवा खुर्द भागातील श्री संत ज्ञानेश्वर नगर सर्व्हे नं ४५ मधील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामागे बाजूस दोन गुंठयामध्ये पाच मजली इमारत काही महिन्यापुर्वी बांधण्यात आली. या इमारतीमध्ये १६ फ्लॅट असून आज सायंकाळच्या सुमारास पार्किंगच्या पुढील बाजूच्या एका कॉलमचा ब्लास्ट झाला. त्या आवाजाने इमारतीमधील सर्व नागरिक घाबरून खाली येऊन उभे राहिले. त्या कॉलमला तडा जाऊन निम्मा भाग तुटला होता. त्यामुळे काही क्षणात इमारत पूर्ण पणे खाली करण्यात आली. या घटनेची माहिती पोलिस आणि महापालिका अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यानंतर इमारतीची पाहणी अधिकाऱ्यांकडून करण्यात आली.

या बाबत पुणे महापालिकेचे नगर अभियंता प्रशांत वाघमारे म्हणाले की, कोंढवा येथील एका इमारतीला तडे गेल्याची माहिती मिळाली आहे. त्यानुसार अधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे. ती इमारत अनाधिकृत असून ती उद्या पाडण्यात येणार आहे. तसेच संबंधितावर कडक कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kondhwa khurd crack to the building
First published on: 02-04-2019 at 00:35 IST