scorecardresearch

कोंढव्यातील टिळेकरनगरमध्ये कोयता गॅंगकडून १५ वाहनांची तोडफोड; वर्चस्वाच्या वादातून गुंडांचा हल्ला

कोंढव्यातील टिळेकरनगर परिसरात वर्चस्वाच्या वादातून गुंडांच्या टोळ्यांमध्ये झालेल्या वादातून वाहनांची कोयता, तलवारीने तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली.

Koyta gang vandalized vehicles Kondhwa
कोंढव्यातील टिळेकरनगरमध्ये कोयता गॅंगकडून १५ वाहनांची तोडफोड (प्रातिनिधिक छायाचित्र)

पुणे : कोंढव्यातील टिळेकरनगर परिसरात वर्चस्वाच्या वादातून गुंडांच्या टोळ्यांमध्ये झालेल्या वादातून वाहनांची कोयता, तलवारीने तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली. टोळक्याने दहशत माजवून १५ वाहनांची तोडफोड केली. या घटनेमुळे परिसरात घबराट उडाली.

हेही वाचा – Viral Video: पुण्यात पीएमपी चालकाचा असाही प्रताप, बस चालवताना मोबाईलवर बघत होता चित्रपट

हेही वाचा – नव्या आर्थिक वर्षात पंतप्रधान आवास योजना, समान पाणीपुरवठा योजनेची कामे पूर्ण करू – महापालिका आयुक्तांची ग्वाही

या प्रकरणी हृषिकेश सुरेश गोरे (वय २०), सुशील राजेंद्र दळवी (वय २०), प्रवीण अशोक भोसले (वय१८) यांना अटक करण्यात आली. कोंढव्यातील टिळेकगनर भागात दोन टोळ्यांमध्ये वाद आहेत. वर्चस्वातून गुंड टोळ्यांमध्ये वाद झाले. रात्री दुचाकीवरून दहा ते बाराजण टिळेकरनगर भागात आले. टोळक्याकडे कोयता, तलवार आणि तीक्ष्ण शस्त्रे होती. टोळक्याने सहा मोटारी, तीन दुचाकी, चार टेम्पो तसेच एका रिक्षाची तोडफोड केली. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-03-2023 at 17:59 IST

संबंधित बातम्या