खेड तालुक्यातील धुवोली गावात बारावीतील विद्यार्थी बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडल्याची दुर्देवी घटना घडली. विद्यार्थ्याबरोबर असलेल्या मित्राने बिबट्यावर दगड भिरकावून त्याची सुटका करण्याचा प्रयत्न केला. बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आल्यानंतर धुवोली गावात शोककळा पसरली.

अजय चिंतामणी जठार (वय १७) असे मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. अजय बारावीत वाणिज्य शाखेत शिक्षण घेत होता. चार दिवसांपूर्वी त्याची बारावीची परीक्षा संपली. अजय आणि त्याचा मित्र साई वाळुंज शुक्रवारी (१७ मार्च) सायंकाळी सातच्या सुमारास रानात जनावरे आणण्यासाठी गेले होते. त्या वेळी रानात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अजयवर हल्ला केला. त्या वेळी प्रसंगावधान राखून साईने बिबट्याच्या दिशेने दगड भिरकावला. बिबट्याने अजयवर हल्ला केला. त्याला ओढत दाट झाडीत नेले. अजयच्या मानेला गंभीर इजा झाली.

stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
Kolhapur Police arrest gang selling fake notes
बनावट नोटांची छपाई, विक्री करणारी टोळी कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात; म्होरक्याचे नेत्यांशी लागेबांधे असल्याची चर्चा
Indiscriminate firing in nagpur by criminal over money of MD
नागपुरात एमडीच्या पैशावरून गुन्हेगाराचा अंधाधुंद गोळीबार, कुख्यात टोळ्या पुन्हा…
(11 goats died in attack by stray dogs in Jalgaon )
जळगावात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात ११ बकर्‍या मृत्युमुखी

साईने आरडाओरडा केला. ग्रामस्थांनी त्याचा आवाज ऐकला. गंभीर जखमी झालेल्या अजयला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला. अजयचा मृत्यू झाल्याचे समजताच गावात शोककळा पसरली.

बिबट्याचा हल्ल्यांमुळे नागरिक भयभीत

खेड, मंचर भागात बिबट्यांच्या हल्ल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे नागरिक सायंकाळनंतर घराबाहेर पडत नाहीत. चार दिवसांपूर्वी खेड तालुक्यातील भिवेगावात बिबट्याच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता. भिवोली गावात बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.