पुणे : पोटच्या मुलीचा खून करणाऱ्या आईला प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन यांनी जन्मठेप आणि दहा हजार रुपयांची शिक्षा सुनावली. पतीशी सुरू असलेल्या वादातून तिने मुलीचा खून करुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना वारजे भागात घडली होती.

अनिता संजय साळवे (वय २५, रा. वारजे) असे शिक्षा सुनावलेल्या महिलेचे नाव आहे. आरोपी अनिताचा पती ४ फेब्रुवारी २०१६ रोजी कामावर गेला होता. अनिताचा पतीश वाद झाला होता. तिने स्वत:च्या लहान मुलीचा शालीने नाक तोंड दाबून खून केला. त्यानंतर तिने पंख्याला साडी बांधून गळफास घेण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. वारजे पोलिसांनी तिला अटक केली होती. त्यानंतर तिच्याविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.

हेही वाचा – Narayangaon Pune Accident : पुण्यातील नारायणगाव येथे ट्रकने कारला उडवले, ९ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या वारसांना मदत जाहीर

या खटल्यात सरकार पक्षाकडून अतिरिक्त सरकारी वकील मिलिंद दातरंगे यांनी बाजू मांडली. सरकार पक्षाकडून २० साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. कौटुंबिक वादातून पतीने बाेलणे टाकले होते, तसेच सासूने दुर्लक्ष केले होते. माझ्यामागे लहान मुलीची जबाबदारी कोण स्वीकारणार, तसेच तिची फरफट होऊ नये म्हणून मुलीचा खून करुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची कबुली तिने पोलिसांकडे दिली होती.

हेही वाचा – पुणे : मेट्रोच्या जागेतील ५० झोपड्या महापालिकेने का हटवल्या ?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोपीच्या गुन्हेगारी कृत्यामुळे निष्पाप बालकाने जीव गमावला असून, तिला कठोर शिक्षा सुनावण्यात यावी. कौटुंबिक वाद आणि नैराश्यातून तिने मुलीचा खून करुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे सरकारी वकील दातरंगे यांनी युक्तिवादात सांगितले. तक्रारदाराकडून ॲड. ए. व्ही. औसेकर यांनी बाजू मांडली. बचाव पक्षाकडून ॲड. सचिन झालटे पाटील यांनी काम पाहिले. छळ आणि नैराश्यातून आईने मुलीचा खून केल्याची ही घटना दुर्मीळ असून, आरोपीची पार्श्वभूमी गुन्हेगारी नाही. तिला कमीत कमी शिक्षा देण्यात यावी, अशी विनंती बचाव पक्षाच्या वकिलांनी युक्तिवादात केली. सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने आराेपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.