पुण्यातील कोंढवा परिसरातील एका भंगाराच्या दुकानात झालेल्या स्फोटात मंगळवारी एकाचा मृत्यू झाला तर दोघे जण जखमी झाले. भंगाराच्या दुकानात असलेल्या जुन्या तोफगोळ्यामुळे हा स्फोट घडल्याचे पोलीसांनी सांगितले. स्फोटाची तीव्रता कमी असल्यामुळे मोठी जीवितहानी झाली नाही. स्फोटानंतर या संपूर्ण परिसराची पोलीसांनी पाहणी केली. अस्लम चौधरी असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलीसांनी घटनास्थळावरून अजून एक तोफगोळाही जप्त केला आहे.
नारायणगावमध्येही स्फोट
जिल्ह्यातील नारायणगावमध्येही जिलेटिन कांड्याच्या स्फोटात एक व्यक्ती गंभीर जखमी झाली. विवाहबाह्य संबंधांच्या प्रकरणातून हा स्फोट घडवून आणल्याची शक्यता पोलीसांनी वर्तविली आहे. स्फोटाची माहिती मिळाल्यावर पोलीस अधीक्षक जय जाधव यांनी अधिकाऱयांसह घटनास्थळी भेट दिली. पोलीसांनी या दोन्ही प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल केले असून, तपास सुरू आहे.
(संग्रहित छायाचित्र)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Low intensity blast at scrap godown in pune
First published on: 01-09-2015 at 04:57 IST