पुणे : राज्यात विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी घेतल्या जाणाऱ्या १९ प्रवेश परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) जाहीर केले. त्यानुसार बारावीनंतरच्या अभियांत्रिकी, तंत्रज्ञान अभ्यासक्रम पदवी प्रवेशासाठीची एमएचटी-सीईटी १६ ते ३० एप्रिल या कालावधीत होणार आहे.

हेही वाचा >>> सीबीएसईच्या दहावी, बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा १ ते १२ जानेवारीदरम्यान, काय आहे मार्गदर्शक सूचनांमध्ये?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सीईटी सेलमार्फत उच्च शिक्षण आणि तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत विविध पदवी, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, कृषि, विधी, हॉटेल मॅनेंजमेंट, डिझाइन अशा विविध अभ्यासक्रमांचा समावेश आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२५मध्ये होणाऱ्या प्रवेश प्रक्रियेसाठी मार्च ते या कालावधीत घेतल्या जाणार आहेत. त्यासाठीचे संभाव्य वेळापत्रक सीईटी सेलकडून जाहीर करण्यात आले.  तीन वर्षांच्या एकात्मिक शिक्षणशास्त्र (बीएड. एम.एड.) हा एकात्मिक अभ्यासक्रम आणि शिक्षणशास्त्र पदव्युत्तर पदवी (एम.एड.) या दोन स्वतंत्र अभ्यासक्रमांच्या परीक्षा २ मार्च होणार आहेत. शारीरिक शिक्षण शास्त्र पदव्युत्तर पदवी (एमपीएड) अभ्यासक्रमाची ऑफलाइन परीक्षा ३ मार्च, शिक्षणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाची (बीएड) ४ ते ६ मार्च, शारीरिक शिक्षणशास्त्र पदवी (बीपीएड) अभ्यासक्रमाची ऑफलाइन परीक्षा ७ मार्च, व्यवस्थापनशास्त्र (एमबीए) अभ्यासक्रमाची परीक्षा ९ आणि १० मार्च, वास्तुकला पदव्युत्तर पदवी (एम. आर्च) आणि हॉटेल मॅनेजमेंट पदवी अभ्यासक्रमाची परीक्षा ११ मार्च,  तीन वर्षे विधी पदवी अभ्यासक्रमाची परीक्षा  १२ आणि १३ मार्च, संगणक उपयोजन पदव्युत्तर पदवी (एमसीए) अभ्यासक्रमाची परीक्षा १४ मार्च, डिझाइन पदवी (बी.डिझाइन) अभ्यासक्रमाची परीक्षा ४ एप्रिल, हॉटेल मॅनेजमेंज पदवी अभ्यासक्रमाची परीक्षा १३ एप्रिलला होणार आहे. एमएचटी-सीईटी १६ ते ३० एप्रिल, चार वर्षांच्या शिक्षणशास्त्र (बीएड) एकात्मिक अभ्यासक्रमाची परीक्षा  २ मे, नर्सिंग पदवी अभ्यासक्रमाची परीक्षा ७ मे होणार आहे. सविस्तर वेळापत्रक https://cetcell.mahacet.org/ या संकेतस्थळावर देण्यात आले आहे.