एकविरा देवी गडावर जाण्यासाठी रज्जू मार्ग (रोप-वे) प्रस्तावित करण्यात आला आहे. भारतीय पुरातत्त्व विभाग, वनविभाग यांच्या सहकार्याने पर्यटन विभागाकडून हा प्रकल्प करण्यात येणार होता. मात्र, आता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन – एमएसआरडीसी) हा प्रकल्प करण्यात येणार आहे. त्याला राज्य शासनाकडून मान्यताही मिळाली आहे.

हेही वाचा >>>राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना आता विमानप्रवासाची सवलत; विभाग सचिवांची पूर्वपरवानगी आवश्यक

Megha Engineering, Eight tenders,
एमएसआरडीसीच्या दोन प्रकल्पांसाठी मेघा इंजिनिअरिंगच्या आठ निविदा, निवडणूक रोखे खरेदीतील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी
Mumbai, tenders, projects,
मुंबई : तीन प्रकल्पांसाठी ८२ निविदा, आचारसंहितेनंतरच अंतिम निर्णयाची शक्यता
The Central Wildlife Board proposed a highway through the largest tiger project in the country
देशातील सर्वात मोठय़ा व्याघ्रप्रकल्पातून महामार्ग जाणार
way of dharavi redevelopment is cleared railway land finally transferred to DRP
धारावी पुनर्विकासाचा मार्ग मोकळा, रेल्वेची २५.५७ एकर जमीन अखेर ‘डीआरपी’कडे हस्तांतरित

एकवीरा देवीचे मंदिर डोंगरावर आहे. सह्याद्री पर्वताच्या कुशीतील कार्ला येथील डोंगरावर हे मंदिर आहे. त्यामुळे पायथ्यापासून मंदिरापर्यंत जाण्यासाठी काही पायऱ्या चढाव्या लागतात. देवीचे मंदिर डोंगरात असून परिसरात लेणी आहे. तिला कार्ला लेणी असे म्हटले जाते. मंदिराचा गाभारा खूप छोटा आहे. हा परिसर देवीच्या दर्शनासह पर्यटनासाठी आणि निसर्गसौंदर्य न्याहाळण्यासाठी उत्तम आहे. त्यामुळे येथे नेहमीच पर्यटकांची गर्दी असते. पावसाळ्यामध्ये या परिसरातील सृष्टी सौंदर्य मनाला मोहवून टाकणारे असते. डोंगरावरून खळाळत कोसळणारे धबधबे पाहण्यासाठी आणि या ठिकाणापासून जवळच प्रसिद्ध लोणावळा आणि खंडाळा ही थंड हवेची ठिकाणे असल्याने या ठिकाणी पर्यटक गर्दी करतात. भाजे लेणीसह लोहगडासह अन्य शिवकालीन ऐतिहासिक किल्ले आहेत. त्यामुळे देवदर्शनाबरोरच पर्यटनासाठीही अनेक जण या भागात येतात.

हेही वाचा >>>देशाच्या अन्नसुरक्षा कायद्यात लवकरच बदल; नीती आयोगाचे डॉ. राज भंडारी यांचे प्रतिपादन

लोणावळ्याजवळील कार्ला येथील श्री एकविरा देवी मंदिरात (फ्युनिक्युलर ट्रॉली) किंवा रोप वे तयार करण्यासाठी राज्य पर्यटन विभाग आणि इंडियन पोर्ट रेल आणि रोप वे कॉर्पोरेशन लिमिटेड (आयपीआरसीएल) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला होता. रज्जू मार्गाच्या निर्मितीसाठी आर्थिक आणि तांत्रिक सोयींसाठी अहवाल तयार करणे, निविदा प्रक्रिया राबवणे यासाठी राज्य पर्यटन विभाग आणि आयपीआरसीएल यांच्यात हा करार करण्यात आला होता. हा प्रकल्प ‘बांधा, वापरा, हस्तांतरित करा’ (बिल्ड ऑपरेट ट्रान्सफर मॉडेल) या तत्त्वावर सुरू करण्यात येणार होता. मात्र, आता हा प्रकल्प रस्ते महामंडळाकडून करण्यात येणार आहे.

लोकप्रिय तीर्थक्षेत्र असल्याने आणि जवळ कार्ला लेणी पर्यटन स्थळ असल्यामुळे या ठिकाणी रज्जू मार्ग प्रकल्पाची निर्मिती करण्यात येत आहे. एकविरा देवी मंदिरात दरवर्षी सात ते आठ लाख भाविक येतात. रज्जू मार्गामुळे एकविरा मंदिरात भाविकांना सहज पोहोचता येणार आहे, परिणामी पर्यटनाला चालना मिळणार आहे, अशी माहिती एमएसआरडीसीचे अधीक्षक अभियंता राहुल वसईकर यांनी दिली.

हेही वाचा >>>फुरसुंगी, उरुळी देवाची गावांना जलसंपदा विभागाकडूनच पाणीपुरवठा

पर्यटन विभागाकडून रस्ते महामंडळाकडे प्रकल्प वर्ग
महाराष्ट्रातील प्राचीन मंदिरे, शिल्प व लेण्यांचे जतन-संवर्धन करण्यासाठी राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ते महामंडळाची (एमएसआरडीसी) निवड केली आहे. त्या अंतर्गत एकविरा देवीच्या मंदिराचाही समावेश आहे. या मंदिराची पाहणी करण्यासाठी पायाभूत सुविधा प्रकल्पाच्या ‘वॉर रुमचे महासंचालक राधेश्याम मोपलवार यांच्यासह महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी केली. त्यानंतर या ठिकाणचा रज्जू मार्ग प्रकल्पही महामंडळाने करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याला राज्य शासनाची मान्यताही मिळाली आहे. त्यामुळे पर्यटन विभागाऐवजी आता हा प्रकल्प महामंडळाकडे वर्ग करण्यात आला आहे.