पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे संस्थापक प्रतापराव गोडसे परिवाराचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा महाविकास आघाडीने केला आहे. त्यासाठी अक्षय गोडसे यांच्या शुभेच्छा देणारी ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित केली जात आहे. महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांच्याविरोधात निवडणूक लढविणारे भाजपा-शिवसेना युतीचे उमेदवार हेमंत रासने हे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे विश्वस्त आणि उत्सवप्रमुख आहेत.

अक्षय गोडसे यांचे एक मिनीट कालावधीचे मनोगत असलेली दृक-श्राव्य ध्वनिफीत समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात आली आहे. ट्रस्टचा पदाधिकारी उमेदवार असताना प्रतिस्पर्धी उमेदवाराला शुभेच्छा देण्याच्या अक्षय गोडसे यांच्या कृतीची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा होत आहे.

हेही वाचा – वाद सहज सुटण्यासारखा नाही, पण दबाव वाढत आहे; संयुक्त राष्ट्रसंघाच्या स्थितीवर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे भाष्य

हेही वाचा – मी मनसेतच! “अजय शिंदेंनी मुख्यमंत्र्यांना भेटण्याचे सांगितले कारण”, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अक्षय गोडसे म्हणतात, रवीभाऊ आणि आमच्या परिवाराचे गेल्या अनेक वर्षांचे नाते आहे. माझे आजोबा आणि ट्रस्टचे संस्थापक तात्यासाहेब गोडसे यांच्यापासून अशोक गोडसे ते माझ्यापर्यंत आणि सगळ्या परिवाराशी त्यांचे स्नेहाचे आणि अत्यंत चांगले नाते आहे. आमच्या परिवाराशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. त्यांच्या भावी वाटचालीला मी मनापासून शुभेच्छा देतो.