पुणे : वीज मीटर घेण्यासाठी दाखल अर्जातील हरकतीवर अनुकूल अहवाल देण्यासाठी ४० हजारांची लाच घेणाऱ्या महावितरणच्या विधी सल्लागारांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले. रास्ता पेठेतील महावितरणच्या कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कारवाई केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या प्रकरणी महावितरणच्या रास्ता पेठ कार्यालयातील विधी सल्लागार सत्यजीत विक्रम पवार, सहायक विधी अधिकारी समीर रामनाथ चव्हाण यांच्या विरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. तक्रारदाराने त्यांच्या नवीन इमारतीत ११ मीटर घेण्यासाठी केलेल्या अर्जावर हरकत घेण्यात आली होती. हरकतीवर अनुकूल अहवाल देण्यासाठी महावितरणचे विधी सल्लागार सत्यजीत पवार, सहायक विधी अधिकारी समीर चव्हाण यांनी तक्रारदाराकडे ४० हजार रुपयांची लाच मागितली होती.

हेही वाचा – पुण्यात हापूस आंब्यांचे आगमन, नियमित हंगाम सुरू होण्यास आणखी महिनाभराचा कालावधी

हेही वाचा – पुणे : फिनिक्स मॉलमधील व्यापाऱ्याकडे खंडणी मागणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर मोक्का

तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिल्यानंतर मंगळवारी रात्री सापळा लावण्यात आला. महावितरणच्या रास्ता पेठेतील कार्यालयात लाच घेताना दोघांना पकडण्यात आले. पवार आणि चव्हाण यांच्या विरोधात रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त श्रीहरी पाटील आणि पथकाने ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahavitaran legal advisers caught taking bribes pune print news rbk 25 ssb
First published on: 15-02-2023 at 10:11 IST