अनैतिक संबंधातून महिलेचा खून करून पसार झालेल्या तरुणाला पोलिसांनी अटक केली. पर्वती पायथा येथील जनता वसाहतीत ही घटना घडली होती.
प्रमोद केशवचंद पडोळे (वय २४, रा. जनता वसाहत) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर अनिता कांबळे (वय ३४, रा. जनता वसाहत) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. गेल्या सहा महिन्यांपासून प्रमोद आणि अनिता यांच्यात अनैतिक संबंध होते. ते जनता वसाहत येथे भाडय़ाने खोली घेऊन राहत होते. काही कारणांवरून त्यांच्यात वाद झाला होता. प्रमोद हा कडधान्यांची विक्री करत होता. तीन दिवसांपूर्वी त्याने अनिता यांना दांडक्याने मारहाण करून त्यांचा खून केला. त्यानंतर तो पसार झाला होता. सुरुवातीला अनिता यांच्या पतीने खून केल्याचा संशय पोलिसांना होता. दत्तवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. तेव्हा प्रमोद याने खून केल्याची माहिती निष्पन्न झाली.
पर्वती टेकडीवरील पाण्याच्या टाकी परिसरात प्रमोद येणार असल्याची माहिती तपास पथकातील उपनिरीक्षक दत्ताजी मोहिते यांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे सापळा लावून त्याला पकडण्यात आले, अशी माहिती पोलीस निरीक्षक श्रीधर जाधव यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man arrested in women murder case
First published on: 07-06-2016 at 00:05 IST