पिंपरी : प्रेम प्रकरणातून तरुणाला घरी बोलावून मारहाण करून आणि गळा आवळून खून केल्याची घटना पिंपळेगुरव येथे घडली. याप्रकरणी मयत मुलाच्या वडिलांनी शुक्रवारी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नऊ जणांना अटक केली असून, दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या मुलाचे एका आरोपीच्या मुलीशी प्रेमसंबंध होते. आरोपींनी चर्चा करण्यासाठी फिर्यादी, त्यांच्या मुलाला पिंपळेगुरव येथे बोलावून घेतले. आरोपींनी मुलाला घरात मारहाण करण्यास सुरुवात केली. खोलीचा दरवाजा बंद केला. अवघड जागी, डोक्यावर बेल्टने मारहाण केली. दोरीने गळा आवळला. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सांगवी पोलीस तपास करत आहेत.