पुणे महापालिकेच्या कचरा वाहतूक करणार्‍या डंपरने ८३ वर्षीय दुचाकीस्वाराला चिरडले

सारसबागेसमोर घडला अपघात

प्रातिनिधिक फोटो

पुण्यातील सारसबागेसमोर दुचाकीवरून जाणार्‍या ज्येष्ठ नागरिकाला पुणे महापालिकेच्या कचरा वाहतूक करणार्‍या डंपरने चिरडल्याची घटना घडली आहे. हिरालाल मोतीलाल ललवाणी असे मृत व्यक्तीचे नाव आहे. हिरालाल हे ८३ वर्षांचे होते.

स्वारगेट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रोडवरून काही कामानिमित्त सारसबागे समोरून हिरालाल मोतीलाल ललवाणी हे दुचाकीवरून जात होते. तेवढ्यात पुणे महापालिकेच्या कचरा वाहतूक करणार्‍या डंपरच्या मागील चाकाखाली येऊन ललवाणी यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर चालकाने घटनास्थळावरुन पळ काढला. मात्र चालक थेट पोलीस स्थानकात गेला आणि त्याने घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Man on two wheeler killed in accident near sarasbagh pune scsg 91 svk