पिंपरी – चिंचवडमध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे. मद्यपान करतेवेळी मित्राने शिवीगाळ केल्याने त्याची ब्लेडने वार करून दोघांनी हत्या केली. त्याचे गुप्तांग कापून त्याचा मृतदेह एका विहिरीत टाकून दिला. ही घटना शनिवारी उघडकीस आली असून याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी अभिषेक उर्फ डल्या गायकवाड याला अटक केली आहे. अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. गणेश भगवान रोकडे वय- १८ असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्या झालेला गणेश आणि अभिषेक यासह अल्पवयीन मुलगा हे तिघेजण मित्र होते. बुधवारी मध्यरात्री चिंचवड रेल्वे स्थानकाच्या जवळ असलेल्या मैदानात तिघे मद्यपान करण्यासाठी बसले होते. त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला आणि याच वादातून गणेशने अभिषेक ला शिवीगाळ केली. शिवीगाळ केल्याच्या रागातून मद्यधुंद असलेल्या अभिषेक आणि अल्पवयीन मुलाने गणेशच्या अंगावर ब्लेडने आणि धारदार शस्त्राने वार करून हत्या केली. त्याचे गुप्तांग कापून त्याचा मृतदेह विहिरीत फेकून दिला. ही घटना बुधवारी मध्यरात्री घडली.

हेही वाचा… एकतर्फी प्रेमातून कारागृहातील शिपाई महिलेला जिवंत पेटवण्याचा प्रयत्न; वरिष्ठ कारागृह आधिकरी अटकेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आरोपी अभिषेक आणि अल्पवयीन मुलगा हे सोसायटीमध्ये घरफोडी करण्यासाठी गेले होते. तिथं त्यांना नागरिकांनी पकडलं आणि त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केलं. या घटनेचा तपास करत असताना अभिषेक आणि अल्पवयीन मुलाने त्याच्या मित्राची हत्या केल्याचं शनिवारी उघड झालं. बेपत्ता गणेशचे कुटुंबीय त्यांचा शोध घेत होते. चिंचवड येथील रेल्वे स्थानकाच्या जवळ विहिरीत गणेशचा मृतदेह आढळला. गणेशच्या कुटुंबीयांनी देखील या दोघांवर आरोप केला. पोलिसांनी अभिषेकला बेड्या ठोकून अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतल आहे. आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. अशी माहिती चिंचवडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांनी दिली आहे.