पिंपरी चिंचवड मधील चिखली भागात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. बुधवारी पहाटे येथील एका हार्डवेअरच्या दुकानाला भीषण आग लागली. या आगीत एकाच कुटुंबातील चार जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. पहाटे गाढ झोपेत असलेल्या कुटुंबाला स्वत:चा जीव वाचवण्यासही अवधी मिळाला नाही. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झालं. आग नियंत्रणात आणली असून कुलिंगचं काम सुरू आहे.

चिमणाराम चौधरी, ज्ञानुदेवी चौधरी, सचिन चौधरी (वय-१०) भावेश चौधरी (वय-१५) असं आगीत मृत पावलेल्यांची नावं आहे. संबंधित सर्वांचा आगीत होरपळून जागीच मृत्यू झाला आहे. बुधवारी पहाटे चिखली परिसरातील सचिन हार्डवेअर दुकानाला आग लागली. याच हार्डवेअर दुकानात चौधरी कुटुंब वास्तव्यास होतं. या आगीत एकाच कुटुंबातील चार जणांचा होरपळून मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही आग नेमकी कशी लागली? याची अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही. पण शॉटसर्किटमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाकडून वर्तवण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड अग्निशमन दलाने ही आग नियंत्रणात आणली असून कुलिंगचे काम सुरू आहे.