पुणे : पुणे शहर आणि परिसरामध्ये गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावली. सुमारे तासाभरातच तब्बल ७१ मि.मी. पावसाची नोंद झाली. यंदाच्या हंगामातील हा सर्वाधिक पाऊस ठरला आहे. जोरदार सरींमुळे तासाभरातच रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणावर पाणी साचले होते. संध्याकाळी उशिरापर्यंत तुरळक ठिकाणी हलका पाऊस सुरू होता. पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार शुक्रवारीही चांगल्या पावसाची शक्यता असून, त्यानंतर पावसाच्या हलक्या सरींचा अंदाज आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नैर्ऋत्य मोसमी वारे शहरात दाखल झाल्यापासून पावसाच्या हलक्या सरी कोसळत होत्या. शहराला दमदार पावसाची अपेक्षा होती. ती गुरुवारच्या पावसाने पूर्ण झाली. यापूर्वी ९ जूनला शहरात जोरदार पूर्वमोसमी सरी बरसल्या होत्या. त्यामुळे सुमारे ४० मि.मी. पावसाची नोंद झाली होती. मात्र शुक्रवारी झालेल्या पावसाने या हंगामातील उच्चांक नोंदविला. दुपारी आकाशात काळेकुट्ट ढग जमा होऊन मोठय़ा पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे घराबाहेर असलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली असली, तरी चांगल्या पावसामुळे समाधान व्यक्त करण्यात येत होते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Massive rain in the pune city zws
First published on: 28-06-2019 at 05:04 IST