पुणे : कर्नाटकातील अंकली येथून श्रीमंत शितोळे सरकार यांचे अश्व संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीत सहभागी होण्यासाठी अंकली येथून पायी येतात. पालखीत सहभागी होण्याआधी या मानाच्या अश्वांनी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दर्शन घेतले.

या वेळी उर्जितसिंहराजे शितोळे सरकार, महादजीराजे शितोळे सरकार, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टचे अध्यक्ष संजीव जावळे यांच्यासह विश्वस्त, भाविक आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत गणपतीची आरती करण्यात आली. पालखी सोहळा मार्गस्थ झाल्यानंतर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या रथापुढे जो अश्व असतो, तो माउलींचा अश्व, तर जरीपटका घेऊन अश्वस्वार असतो तो स्वाराचा अश्व, असे हे दोन्ही अश्व पालखीबरोबर पंढरपूरपर्यंत जातात.

वारकरी संप्रदायात १८३२ पासून ही परंपरा आहे. अंकली येथील शितोळे राजे यांच्याकडे या अश्वांची ही मानाची परंपरा असल्याची माहिती जावळे यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.