पिंपरी- चिंचवड : मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून कोण उमेदवार असणार यावरून तर्कवितर्क लावले जात आहेत. यावर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी भाष्य करत पुढील दीड महिन्यात श्रीरंग बारणे हेच खासदार असतील असं विधान केलं आहे. त्यामुळे श्रीरंग बारणे हेच शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. श्रीरंग बारणे यांनी नुकतंच ते कुठल्या पक्षातून आणि कुठल्या चिन्हावर लढणार याबाबत बोलणं टाळलं होतं. केवळ मी महायुतीचा उमेदवार असेल असं ठामपणे बारणे यांनी सांगितलं होतं. उद्योग मंत्री उदय सामंत हे पिंपरी- चिंचवडमध्ये खासगी कार्यक्रमासाठी आले होते. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

उदय सामंत म्हणाले, माझं मन सांगत आहे. श्रीरंग बारणे हेच दीड महिन्यानंतर निवडून येतील. पुढे ते म्हणाले, खासदारकीसाठी मी कुठेही इच्छुक नाही. त्यामुळे मी लढण्याचा प्रश्न येत नाही. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हा जिल्हा शिवसेनेला मिळावा. हा आमचा दावा आहे. तिथे शिवसेनेचा उमेदवार निवडून आला होता. ते आमच्या सोबत आले नाहीत हे दुर्दैव आहे.

sanjay raut spoke offensive and derogatory manner about female candidate navneet rana says girish mahajan
संजय राऊतांबाबत बोलून आम्हाला…”, गिरीश महाजनांची टीका
controversy, nitin Gadkari photo, agitation of congress, nagpur
मतचिठ्ठीवर गडकरींचे छायाचित्र, नागपुरात भाजप- काँग्रेसमध्ये वादावादी !
vijay vadettiwar hansraj ahir kishor jorgewar rajendra vaidya sandeep girhe away from election campaign
नेत्यांचे रूसवे फुगवे! वडेट्टीवार, अहीर, जोरगेवार, वैद्य, गिऱ्हे प्रचारापासून दूर
Shrikant Shinde
कल्याणमधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; भाजपा कार्यकर्त्यांवरही टीका, म्हणाले…

आणखी वाचा-मावळमध्ये २० हजार लिटर दारू पोलिसांनी केली नष्ट; याआधीही केली होती कारवाई

पुढे ते म्हणाले, मनसेचे अमेय खोपकर आणि संदीप देशपांडे यांच्यासोबत चर्चा झाली. पण ती राजकीय नव्हती. खोपकर हे माझे जवळचे मित्र आहेत. त्यांची नुकतीच शस्त्रक्रिया झाली होती, म्हणून बघायला गेलो होतो. तसेच सामंत यांनी विजय शिवतारे यांच्यावर बोलण्यास नकार दिला. झेपेल असे प्रश्न विचारा. अस म्हणत त्यांनी बोलणं टाळलं. पुढे ते म्हणाले, जागा वाटपविषयी सर्व अधिकार आम्ही एकनाथ शिंदे यांना दिले आहेत. त्यांचा निर्णय हा आम्हाला मान्य असेल असेही सामंत म्हणाले.