पुणे : राज्यातील शाळांतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत शिजवलेले अन्न १५ मार्चपासून देण्याचे प्रस्तावित आहे. करोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून शाळा स्तरावर शालेय पोषण आहार देण्याबाबत क्षेत्रीय अधिकाऱ्यांना विस्तृत सूचना दिल्या जातील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यातील शाळा सुरू होऊनही शालेय पोषण आहार योजना अद्याप बंदच ठेवण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची अडचण होत आहे. करोना काळात राज्य शासनाकडून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य म्हणून शाळा बंद ठेवण्यात आल्या, मात्र आता शाळा सुरू झाल्यास विद्यार्थ्यांना आवश्यक असलेला पोषण आहार बंदच असल्याने त्याचा विद्यार्थ्यांवर विपरित परिणाम होत असल्याचे राज्यातील विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ, आरोग्य-शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते, शिक्षकांनी निवेदनाद्वारे निदर्शनास आणून दिले. त्यासंदर्भातील निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आले. या पार्श्वभूमीवर १५ मार्चपासून शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना शिजवलेले अन्न देण्याचे प्रस्तावित असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी मंगळवारी दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Midday meals in schools from march 15 zws
First published on: 23-02-2022 at 00:37 IST