पुणे : राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शिवसेनेचे बंडखोर आमदार शंभूराज देसाई यांनी आज पुण्यात उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांची बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देखील दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दौरे करण्यापेक्षा प्रशासकीय कामात लक्ष द्यावे असा सल्ला शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना दिला होता . त्यावर ते म्हणाले की, प्रशासकीय काम कुठेही थांबलेले नाही. मंत्रिमंडळाच्या नियमित बैठका होत आहे. मंत्री देखील नियमितपणे काम करीत आहे. माननीय मुख्यमंत्री हे कुठे ही मौजमजा करण्यास फिरत नाही. राज्यातील जनतेचे प्रश्न समजून घेण्यासाठी ते फिरत आहेत. राज्यातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्या करीता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली येथे दोन दिवसापासून आहेत. राज्यातील प्रश्नांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच ते पुढे म्हणाले की, मागील मुख्यमंत्री अडीच वर्षात मंत्रालयात आले नाहीत. त्यावेळी पवार साहेबांनी, मुख्यमंत्र्यांना सांगायला पाहिजे होते. तुम्ही मंत्रालयात जावा,तुम्ही लोकांना भेटा, तुम्ही लोकांचे प्रश्न समजून घ्या. त्यावेळी शरद पवार यांनी हाच सल्ला किंवा आदेश दिला असता.तर ते अधिक बर झालं असत, अशा शब्दात शंभूराजे देसाई यांनी शरद पवार यांना टोला लगावला.

Mahayutis Srirang Barne Show of Power An 80-year-old lady Shiv Sainik also participated in rally
महायुतीच्या श्रीरंग बारणेंचं शक्ती प्रदर्शन; ८० वर्षाच्या कट्टर शिवसैनिक आजीही रॅलीत सहभागी
Udayanraje Bhosle filled the nomination form in a show of strength
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करत उदयनराजेंनी भरला उमेदवारी अर्ज
UBT leader joins shiv sena shinde group
उबाठा गटाला धक्का, माजी मंत्र्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश; मिलिंद नार्वेकरांवर केले गंभीर आरोप
vinod patil s meeting with chief minister deputy chie
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी विनोद पाटील यांची चर्चा; छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात उमेदवारी देण्याच्या हालचाली

हेही वाचा : निर्मला सीतारामन यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांसह बैठक; भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना प्रवेश नाकारला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ताकदीने दसरा मेळावा होणार

दसरा मेळाव्या वरून वाद सुरू आहे. त्या प्रश्नावर शंभूराज देसाई म्हणाले की,शिवसेनेचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हिंदू गर्जना यात्रा राज्यभरात सुरू आहे. सातारा,सोलापूर, अहमदनगर आणि पुणे या चार जिल्ह्यांची माझ्यावर जबाबदारी होती. त्या यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. या यात्रेतून मागील अडीच महिन्यामध्ये जनतेसाठी केलेल काम सांगितले. या यात्रेतून जनतेच्या भावना लक्षात घेता. शिवसेना आणि भाजपची नैसर्गिक युती राहिली पाहिजे होती. मात्र लोकांना अडीच वर्षात बोलण्याची संधी मिळत नव्हती.आमच्या भूमिकेमुळे लोकांना बोलण्याची संधी मिळाली आहे. हे लवकर होण्याची गरज होती. अशा तरुण वर्गाकडून प्रतिक्रिया आल्या असल्याच त्यांनी सांगितले.

हेही वाचा : निर्मला सीतारामन यांनी पुणेकरांना दिला आश्चर्याचा धक्का; मराठीत भाषणाला सुरुवात करत म्हणाल्या, “सगळ्या पुणेकर…”

तसेच ते पुढे म्हणाले की,मुंबईत पाच तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दसरा मेळावा होणार आहे.न्यायालयामध्ये शिवसेना ठाकरे गट गेलेला आहे. त्यामुळे दसरा मेळावा ही बाब न्यायप्रविष्ट झालेली आहे.आम्ही कायद्याच, नियमांच पालन करणारे कार्यकर्ते आहोत.आम्ही दोन्ही जागेवर परवानगी मागितलेली आहे. प्रशासन आणि न्यायालय जिथे परवानगी देईल.त्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ताकदीने मेळावा होणार असल्याच त्यांनी सांगितले.