केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नियोजित बारामती दौऱ्यासंदर्भात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आठवडाभरापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये एक विधान केलं होतं. “केंद्रीय मंत्री येत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. निर्मला सीतारामन येतील. जनतेशी संवाद साधतील. बारामती, पुरंदर, शिरूरमध्ये येऊन त्या आपले विचार सांगतील. त्या सगळ्या भागातल्या जनतेला त्यांचे विचार, त्यांची भाषा सहजपणे समजेल”, असं पवार म्हणाले होते. मात्र आपल्या पुणे आणि बारामती दौऱ्यातील पहिल्याच दिवशी निर्मला सीतारामन यांनी पुणेकरांना थेट मराठीमध्ये भाषणाची सुरुवात करत बुधवारी आश्चर्याचा धक्का दिला.

निर्मला सीतारामन या नेहमी इंग्रजीमधून भाषण करतात. मात्र बुधवारी पार पडलेल्या कार्यक्रमामध्ये त्यांनी आपल्या भाषणाची सुरूवात इंग्रजीमधून न करता थेट मराठी भषेतून केली. “सगळ्या पुणेकर बंधू भगीनींना माझा नमस्कार, तुम्ही सगळे कसे आहात?” असं म्हणत अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणाला त्यांनी सुरूवात केली. निर्मला सीतारामन यांनी मराठीमध्ये भाषणाला सुरुवात केल्यानंतर सभागृहामध्ये उपस्थित नागरिकांनी टाळ्या वाजवून त्यांच्या या प्रयत्नांना दाद दिल्याचं पहायला मिळालं. भारतीय जनता पार्टीने सिंबायोसिस महाविद्यालयातील विश्‍वभवन येथे आयोजित केलेल्या ‘व्यवस्था परिवर्तनाची वीस वर्षे’ या विषयावरील व्याख्यानात सीतारामन बोलत होत्या.

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray Balasaheb Thackeray
‘आम्ही त्यांचा आदर करु शकत नाही’, बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
Ramdas Athawale, raj thackeray
“महायुतीला राज ठाकरेंच्या पाठिंब्याची गरज नव्हती, मात्र…”, रामदास आठवले यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
Raj Thackeray Ankita walavalkar
“राज ठाकरेंनी महायुतीच्या सत्तेत सहभागी होण्यापेक्षा…”, कोकण हार्टेड गर्लची खास इच्छा; अमित शाहांबरोबरच्या भेटीवर म्हणाली…
aditya thakceray on shinde group candidate change
“ज्यांनी दिली साथ, त्यांचा केला घात; हेच शिंदे गटाचं ब्रीदवाक्य”, उमेदवार बदलण्यावरून आदित्य ठाकरेंची टीका; म्हणाले…

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारचा पारदर्शक कारभार आणि भ्रष्टाचारमुक्त सरकार देण्यासाठी वेळोवेळी घेतलेल्या धोरणात्मक निर्णयांमुळेच देशाचे स्वरूप बदलत असल्याचं सीतारामन यांनी या भाषणामध्ये म्हटलं. मोदींच्या धोरणात्मक निर्णयांमुळेच व्यवस्थेत परिवर्तन झाले आहे असं प्रतिपादन अर्थमंत्र्यांनी केलं. संस्कृतीची जोपासना, विविध सेवा प्रणालींचे आधुनिकीकरण, मोठ्या प्रमाणात होत असलेल्या विकासकामांतून मोदींनी देशात केलेले परिवर्तन स्पष्टपणे दिसत आहे, असंही त्या म्हणाल्या.

“नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी केंद्र सरकारने अनेकवेळा त्यांना अडचणीत आणण्याच काम केलं. तसेच त्यांना कोणत्याही प्रकारची मदत केली जात नव्हती. मात्र या सर्व अडचणीवर मात करून मोदींनी गुजरातचा विकास करून दाखवला. मोदींना कुठलाही प्रशासकीय अनुभव नसताना त्यांनी गुजरातमध्ये आलेल्या भूकंपानंतर सर्व गोष्टी व्यवस्थित हाताळून दाखवल्या,” असे मत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केले. राज्याचे उच्च आणि तंत्रज्ञान शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार राम शिंदे या कार्यक्रमाला उपस्थित होते.