scorecardresearch

पुणे : एकतर्फी प्रेमातून युवतीवर ॲसिड टाकून जीवे मारण्याची धमकी

युवतीला जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी अमोल नवगिरे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

पुणे : एकतर्फी प्रेमातून युवतीवर ॲसिड टाकून जीवे मारण्याची धमकी
photo source : loksatta file photo

पाषाण परिसरातील घटना; एकाच्या विरोधात गुन्हा

पाषाण भागातील एका हॉटेलमध्ये मित्रमैत्रिणींसोबत वाढदिवस साजरा करणाऱ्या अल्पवयीन युवतीला एकतर्फी प्रेमातून ॲसिड टाकून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची घटना घडली. याबाबत एका युवतीने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. युवतीला जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी अमोल नवगिरे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अमोल हा युवतीच्या ओळखीचा आहे.

हेही वाचा >>>पुण्यात दुचाकी चोरांचा उच्छाद ; दररोज पाच ते सहा दुचाकी चोरीला

पाषाण भागातील एका हॉटेलमध्ये युवती वाढदिवस साजरा करण्यासाठी गेली होती. त्या वेळी अमोल हॉटेलमध्ये आला. त्याने मित्रमैत्रिणींसोबत वाढदिवस साजरा करणाऱ्या युवतीला धमकावले. ’तू माझी नाही झाली तर कोणाची होणार नाही’, अशी धमकी त्याने दिली. युवतीच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकण्याची धमकी दिली. हॉटेलमध्ये युवतीशी असभ्य वर्तन केले. त्यानंतर अमोल पसार झाला. या प्रकारामुळे घाबरलेल्या युवतीने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक चाळके तपास करत आहेत. दरम्यान, ओैंध परिसरात एकतर्फी प्रेमातून श्वेता रानवडे या तरुणीचा खून केल्याची घटना गेल्या महिन्यात घडली होती. श्वेताचा खून करुन पसार झालेल्या प्रतीक ढमाले याने मुळशी धरण परिसरात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. तसेच प्रभात रस्ता परिसरात एका तरुणीचा पाठलाग करुन तिच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकण्याची घटना नुकतीच घडली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-12-2022 at 11:06 IST

संबंधित बातम्या