पिंपरी- चिंचवडमधील वकिलाची अनैतिक संबंधातून हत्या झाल्याचं समोर आलं असून या प्रकरणी तीन जणांना पिंपरी- चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. नात्यातील महिलेसोबत असलेल्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून त्या महिलेच्या पतीने शिवशंकर शिंदे यांच अपहरण करून हत्या केली. ३१ डिसेंबर रोजी दुपार च्या सुमारास शिवशंकर हे बेपत्ता झाल्याची तक्रार वाकड पोलिस ठाण्यात दिली होती. 

आज शिवशंकर यांचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत महाराष्ट्रात- तेलंगणा सीमेवरील मदनुर येथे मृतदेह आढळला होता. तेथील पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी हत्या केल्याचं सांगितलं आहे. शिवशंकर आणि त्यांच्या नात्यातील महिलेचे गेल्या काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. 

Girl brutally killed by boyfriend in Mankhurd
मानखुर्दमधील तरुणीची प्रियकराकडून निर्घृण हत्या, स्थानिकांमध्ये संताप
satara lok sabha marathi news, udayanraje bhosale latest marathi news
मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराच्या मुद्द्याभोवतीच साताऱ्यातील प्रचार
vijaysinh mohite patil marathi news, vijaysinh mohite patil solapur lok sabha marathi news
मोहिते-पाटलांच्या महायुती नेत्यांशी गाठीभेटी, भाजप सावध; राजन पाटलांना प्रचारात जुंपले
NIA action in Bangalore blast case two arrested from Kolkata
कोलकात्यातून दोघांना अटक; बंगळूरु बॉम्बस्फोटप्रकरणी ‘एनआयए’ची कारवाई

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ डिसेंबर रोजी पिंपरी- चिंचवडमधील काळेवाडीतुन वकील शिवशंकर हे बेपत्ता झाले होते. त्यांची मोपेड दुचाकी ऑफिस बाहेर च उभा होती. तसेच, ऑफिसमध्ये आढळलेले रक्ताचे डाग यामुळं पिंपरी- चिंचवड पोलिसांना अपहरणाचा संशय होता. त्या दिशेने तपास सुरू असताना आज सकाळी शिवशंकर यांचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत महाराष्ट्रात- तेलंगाणा सीमेवर आढळला. या प्रकरणी तेथील पोलिसांनी तातडीने तिघांना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता मुख्य आरोपीच्या पत्नीसोबत शिवशंकर यांचे अनैतिक संबंध असल्याचा संशय आरोपीला होता. त्यामुळं शिवशंकर यांचं अपहरण करण्याचा कट रचण्यात आला. 

३१ डिसेंबर रोजी मुख्य आरोपी (अद्याप नाव सांगण्यात आलं नाही) त्याचा भाचा आणि चालक यांनी शिवशंकर यांच्या ऑफिसमध्ये गेले. तिथं त्यांच्या तोंडाला आणि हाताला चिकट पट्टी लावून अपहरण करण्यात आलं. ऑफिसमध्ये त्यांच्यात झटापट झाली. एका खासगी वाहनातून शिवशंकर यांना ड्रममध्ये डांबून महाराष्ट्रात – तेलंगणा सीमेवर घेऊन जाण्यात आलं. वाहनातून जात असतानाच शिवशंकर यांची हत्या करण्यात आली. पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने शिवशंकर यांचा मृतदेह जाळण्यात आला. परंतु, तो अर्धवट जळाला होता. पोलिसांनी तातडीने तिघांना ताब्यात घेतलं असून त्यांनी हत्या केल्याचं तपासात समोर आले आहे. शिवशंकर यांचे नात्यातील महिलेसोबत गेल्या काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते. महिलेचा विवाह झालेला होता. शिवशंकर आणि त्या महिलेबाबत तिच्या पतीला माहिती मिळाली. यावरून महिलेचे आणि तिच्या पतीचे वाद होत होते. अखेर ती महिला पतीला सोडून राहात होती. याच रागातून आरोपीने शिवशंकर यांचं अपहरण करून हत्येचा कट रचला होता. अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.