पुणे : मागील दोन वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुट पडल्यानंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणूका झाल्या. या दीड वर्षाच्या कालावधीत शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांनी सार्वजनिक कार्यक्रमात येण्याचे बर्‍याच वेळा टाळल्याचे पाहण्यास मिळाले. पण १२ डिसेंबर रोजी शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दिल्ली येथे अजित पवार यांनी कुटुंबियासोबत भेट घेऊन शुभेच्छा दिल्या होत्या. यामुळे येत्या काळात शरद पवार आणि अजित पवार एकत्रित येण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. त्या सर्व घडामोडी दरम्यान अजित पवार गटाचे हडपसरचे आमदार चेतन तुपे यांनी शरद पवार यांची पुण्यात भेट घेऊन जवळपास अर्धा तास चर्चा केली.

यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चाना उधाण आले. या भेटीनंतर चेतन तुपे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला असता दोन्ही पवारांनी एकत्र यावं का त्या प्रश्नावर ते म्हणाले की, दोन्ही पवार एकमेकांना भेटत असून वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. महाराष्ट्राची इच्छा आहे. त्या प्रमाणे ते करतील, अशी भूमिका त्यांनी मांडली.

आणखी वाचा-पिंपरी : महापालिकेची मोठी कारवाई; थकबाकी असलेल्या १२८ मालमत्ता ‘सील’, पुढील…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रत्येक गोष्टीला राजकारणाशी जोडू नये : आमदार चेतन तुपे

मी रयत शिक्षण संस्थेचा पश्चिम विभागाचा अध्यक्ष आहे. या विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या शाळा, महाविद्यालयामध्ये येत्या वर्षभराच्या कालावधीत कशा प्रकारे संस्थेच कामकाज केले पाहिजे. त्यावर चर्चा झाली. शरद पवार हे सर्वांचे असून शरद पवार हे आमच्या घरातील व्यक्ती आहेत. राजकारण हा विषय कायम नसतो आणि आमचे कौटुंबिक संबंध आहेत. त्यामुळे प्रत्येक गोष्टीला राजकारणाशी जोडू नये, तसेच शरद पवार, माझे वडील स्व. विठ्ठल तुपे आणि अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करीत आलो आहे. मी यांच्याकडून एक शिकलो आहे. ते म्हणजे महाराष्ट्राची एक संस्कृती आहे. राजकारण हा एक महिन्यापुरता विषय असतो. त्यामुळे एक महिन्यापुरतं राजकारण करायच असतं, त्यानंतर विकासाच्या दृष्टीने पावल टाकायची असतात, अशी भूमिका चेतन तुपे यांनी मांडली.