प्रशासन यावर लवकरच कारवाई करेल

चिखली कुदळवाडीमध्ये भंगार गोडाऊनला भीषण आग लागल्यानंतर यावरून राजकारण रंगायला सुरुवात झाली आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांनी या भंगार गोदामांमध्ये काम करणारे हे बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंगे असल्याचा दावा केला आहे. ही शहराच्या दृष्टीने गंभीर बाब असल्याचं महेश लांडगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी दिलेल्या निवेदनात म्हटल आहे.

हेही वाचा >>> पिंपरी-चिंचवड: “अनधिकृत गोदामांवर नंतर बोलू आधी आग विझवू”, अतिरिक्त आयुक्तांची अनधिकृत गोदामांना बगल!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चिखली कुदळवाडी मध्ये भंगार गोडाऊनला भीषण आग लागली. धुरांचे लोट काही किलोमीटर अंतरावरून दिसत होते. चिखली कुदळवाडीत सातत्याने होत असलेल्या या आगीच्या घटनांकडे आमदार महेश लांडगे यांनी लक्ष वेधल आहे. चिखली कुदळवाडी मध्ये बेकायदेशीरपणे भंगार व्यावसायिक गोडाऊन थाटत असल्याच त्यांनी म्हटलं आहे. गंभीर बाब म्हणजे भंगार व्यवसायिकांमध्ये काम करणारे काही कामगार हे बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंगे असल्याचा दावा त्यांनी केला आहे. याबाबत प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी. अशी मागणी करत आम्ही देखील पाठपुरावा करू असं लांडगे यांनी म्हटलं आहे.