पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुल येथे खेळाचे प्रशिक्षण घेणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अॅथलेटिक्सचे प्रशिक्षण घेणाऱ्या खेळाडूने विनयभंग केल्याची घटना आज उघडकीस आली असून या घटनेचा हिंजवडी पोलीस अधिक तपास करीत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ वर्षीय मुलीचा विनयभंग करणारा आरोपी चंद्रकांत रमेश झगडे (वय २२, रा. बालेवाडी क्रीडा संकुल, मूळ दापोली, रत्नागिरी) याला अटक करण्यात आली आहे.
त्याच्यावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (पास्को) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रकांत हा बालेवाडी क्रीडा संकुल येथे अॅथलेटिक्स खेळाचे प्रशिक्षण घेत असून पीडिता १५ वर्षाची मुलगी सायकलिंगचे प्रशिक्षण घेत आहे. आरोपीने मुलीची इच्छा नसताना देखील फोन खरेदी करून दिला. त्यानंतर सप्टेंबर २०१६ ते ३ मार्च २०१७ या कालावधीत सतत फोन करून संवाद वाढविला. तिला परवानगीशिवाय संकुलाच्या बाहेर घेऊन जात होता. संकुलाबाहेर तिला त्याने तिला बळजबरी नेले. या त्रासाला कंटाळून तिने ही माहिती प्रशिक्षणांना दिली. आरोपी कलम ३५४ (विनयभंग) आणि ३६४ (अपहरण) नुसार गुन्हे नोंदविण्यात आले आहे.