पुणे : केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत खोटी चौकशी आणि दडपशाही केंद्रातील भारतीय जनता पक्ष करत आहे. त्यातूनच अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर सूड बुद्धीने करावाई करण्यात आली आहे, असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कारवाईच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली बालगंधर्व रंगमंदिर येथील झाशी राणी चौकात आंदोलन करण्यात आले. विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, महिला शहराध्यक्षा मृणालिनी वाणी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. भाजपकडून सुडाचे राजकारण केले जात आहे. भाजप नेत्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर येत असल्याने केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. त्यातून राज्यातील महाविकास आघाडी सरकारला खाली खेचण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला.
संग्रहित लेख, दिनांक 24th Feb 2022 रोजी प्रकाशित
कारवाईच्या निषेधार्थ पुणे, पिंपरीत आंदोलन
केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत खोटी चौकशी आणि दडपशाही केंद्रातील भारतीय जनता पक्ष करत आहे.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 24-02-2022 at 00:02 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Movement in pune pimpri protest action misuse central investigative ysh