scorecardresearch

एमपीएससी परीक्षार्थींचे उद्या पुण्यात ‘अराजकीय साष्टांग दंडवत’ आंदोलन

२०२३ ऐवजी २०२५पासून हे बदल लागू करण्याची राज्यभरातील उमेदवारांची मागणी आहे.

mpsc
संग्रहित छायाचित्र/लोकसत्ता

पुणे : राज्यसेवा परीक्षेतील बदल २०२५ पासून लागू करण्याच्या मागणीसाठी एमपीएससी उमेदवारांतर्फे उद्या (३१ जानेवारी)  ‘अराजकीय साष्टांग दंडवत’ आंदोलन करण्यात येणार आहे. पुण्यातील अलका टॉकिज चौकात हे आंदोलन होणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) राज्यसेवा मुख्य परीक्षेत बदल करण्याचे जाहीर केले आहे. तसेच हे बदल २०२३ पासून लागू होणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. मात्र २०२३ ऐवजी २०२५पासून हे बदल लागू करण्याची राज्यभरातील उमेदवारांची मागणी आहे. या अनुषंगाने काही दिवसांपूर्वी काँग्रेसतर्फे दोनवेळा आंदोलन करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर मंगळवारी पुण्यात आंदोलन करण्यात येणार आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-01-2023 at 04:39 IST