वीज कंपन्यांतील देखभाल व दुरुस्तीची कामे लॉटरी पद्धतीने बेरोजगार विद्युत अभियंत्यांना देण्याचा निर्णय राज्य शासनाने नुकताच घेतला आहे. त्या माध्यमातून अनेक विद्युत अभियंत्यांना रोजगार उपलब्ध होऊ शकणार आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत इमारती, रस्ते तसेच विद्युत विभागाची विविध कामे बेरोजगार अभियंत्यांकडून केली जातात. याच धर्तीवर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी व महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती कंपनी या तीनही कंपनीतील देखभाल व दुरुस्तीची कामे बेरोजगार अभियंत्यांना देण्यात येणार आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाप्रमाणेच विद्युत बेरोजगार अभियंत्यांचा प्रथम नोंदणीचा वर्ग ‘ब-१’ असा राहणार आहे. त्यांना विद्युत वाटपाची एकूण मर्यादा ५० लाखांपर्यंतची असून, प्रत्येक कामाची कमाल मर्यादा किमान १० लाख रुपये इतकी राहणार आहे.