इन्स्टिटय़ूट ऑफ कंपनी सेक्रेटरिज ऑफ इंडियातर्फे  (आयसीएसआय) घेण्यात आलेल्या कं पनी सचिव (सीएस) अभ्यासक्रमाच्या फाउंडेशन परीक्षेत मुंबईतील अपर्णा अगरवालने संयुक्त द्वितीय क्रमांक मिळवला. तर राष्ट्रीय पातळीवर या परीक्षेत ७०.२२ टक्के  विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आयसीएसआयकडून सोमवारी या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. २६ व २७ डिसेंबरला ही परीक्षा घेण्यात आली होती. बेंगळुरूच्या बालाजी बी. जी. या विद्यार्थ्यांने राष्ट्रीय पातळीवर प्रथम क्रमांक पटकावला. तर, जबलपूरच्या प्रिया जैन, मुंबईतील भाईंदर येथील अपर्णा अगरवाल यांनी संयुक्तपणे द्वितीय क्रमांक मिळवला. भुवनेश्वरची निकिता जैन आणि कोलकाता येथील चिराग अगरवाल यांनी संयुक्तरीत्या तृतीय क्रमांक पटकावला. विद्यार्थ्यांना http://www.icsi.edu या संकेतस्थळावर निकाल पाहता येईल, गुणपत्रिका डाऊनलोड करता येईल. सीएस फाउंडेशनची पुढील परीक्षा पाच व सहा जूनला होणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai aparna agarwal is second in cs foundation abn
First published on: 19-01-2021 at 00:39 IST