मला उमेदवारी दिल्यानंतर शरद पवार साहेब आणि अजित पवार तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे सगळे जण तन, मन धनाने काम करत होते. माझ्या विजयासाठी काम करण्यासाठी रात्रंदिवस हे सगळे झटत होते. या विजयापर्यंत मला राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याची साथ लाभली. शिवसेना आणि शिवसेनेचे कार्यकर्ते यांनीही खूप मेहनत घेतली. आदित्य ठाकरेंचा रोड शो आणि सभाही चांगली झाली. उद्धव ठाकरेंना जे मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं त्याचा राग लोकांच्या मनात होता. तो निकालातून व्यक्त झाला आहे असं कसबा पेठेचे विजयी उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी म्हटलं आहे. माझा विजय ही महाविकास आघाडीच्या भव्य विजयाची नांदी आहे असंही रवींद्र धंगेकर यांनी म्हटलं आहे. भाजपाने पैशांचा धूर या निवडणुकीत काढला पण त्यात तेच जळून खाक झाले असंही

एक कुटुंब प्रमुख जसा असतो त्या प्रमाणे मला शरद पवार आणि अजित पवार यांनी मला मार्गदर्शन केलं. पवार कुटुंब आणि माझं नातं हे अनेकांना माहित आहे. पवार कुटुंबाने दिलेलं प्रेम कधीही विसरणार नाही. प्रशांत जगताप आणि त्यांच्यासोबत असलेले सगळे कार्यकर्ते, गणेश नलावडे आणि इतर कार्यकर्ते या सगळ्यांचे मी आभार मानतो. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्यांचे मी आभार मानतो असं रवींद्र धंगेकर यांनी म्हटलं आहे.

मी काही वेळातच गिरीश बापट यांची भेट घेऊन त्यांचा आशीर्वाद घेणार आहे. कसब्यात पैशांचा धूर झाला. पैशांच्या धुरात भाजपा आणि शिंदे सरकार जळून खाक झालं आहे. पण महाराष्ट्रातल्या राजकारणाची चांगली परंपरा म्हणून मी गिरीश बापट यांची भेट घेणार आहे. ते ज्येष्ठ नेते आहेत. ते इतका काळ या ठिकाणी खासदार होते त्यामुळे मी त्यांची भेट घेऊन आशीर्वाद घेणार आहे. कसब्यातल्या या निवडणुकीत भाजपाने खूप पैसा ओतला. मागचे पंधरा दिवस पैशांचा पाऊस पडला होता पण लोकांनी त्यांना जागा दाखवली असंही रवींद्र धंगेकर यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत बोलून दाखवलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कसबा गणपतीसमोर मी उपोषणही केलं होतं. मी जनतेचे आभार मानतो आहे. मला जनतेचे आभार मानतो आहे. सुरूवातीला मी शिवसेना कार्यालयात जाणार आहे. त्यानंतर महात्मा फुले वाड्यात जाणार आहे. त्यानंतर कसबा गणपतीची आरती करणार आहे त्यानंतर मी गिरीश बापट यांची भेट घेणार आहे.