पुणे : देशभरातील विद्यापीठे, महाविद्यालयांच्या मूल्यांकन आणि अधिस्वीकृतीची (नॅक) प्रक्रिया शंकास्पद आहे. या प्रक्रियेत वेगवेगळय़ा पातळय़ांवर अनेक गैरप्रकार होत आहेत. संशयास्पद सल्लागारांकडून मोठे शुल्क आकारून उच्च शिक्षण संस्थांना उच्च श्रेणी मिळवून दिल्या जात असल्याचा अहवाल तज्ज्ञ समितीकडून विद्यापीठ अनुदान आयोगाला (यूजीसी) सादर करण्यात आल्याचे समोर आले आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डॉ. भूषण पटवर्धन यांनी नॅकच्या कार्यकारी परिषदेच्या अध्यक्षपदाचा रविवारी राजीनामा दिला. त्यांनी राजीनामा देण्यापूर्वी यूजीसीकडून अतिरिक्त अध्यक्ष नियुक्त करण्याचा प्रकार समोर आला होता. त्यामुळे केंद्रीय संस्थांतील अनागोंदी उघडकीस आली. मात्र, त्यापूर्वी नॅक प्रक्रियेत होणाऱ्या गैरप्रकारांबाबतचा अहवाल सादर करून सखोल चौकशी करण्याच्या मागणीकडे यूजीसीने दुर्लक्ष केल्याचे डॉ. पटवर्धन यांनी त्यांच्या पत्रात नमूद केले होते. डॉ. पटवर्धन यांच्या राजीनामा प्रकरणातून देशातील उच्च शिक्षणाची गुणवत्ता जोखण्यासाठीचा महत्त्वाचा निकष मानल्या गेलेल्या नॅक मूल्यांकन प्रक्रियेबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

More Stories onपुणेPune
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nac evaluation process questionable expert committee report ysh
First published on: 08-03-2023 at 00:02 IST