पुणे: पुणे शहर काँग्रेस कार्यालयात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली पाश्चिम महाराष्ट्र विभागीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यापूर्वी राज्यातील अनेक घटना बाबत नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. यावेळी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार विश्वजीत कदम, आमदार प्रणिती शिंदे, पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्यासह आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. मात्र या बैठकीला कसबा विधानसभा मतदार संघाचे आमदार रविंद्र धंगेकर हे उपस्थित नव्हते तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी असलेल्या बॅनरवर फोटो देखील नव्हता.
आणखी वाचा-‘हाफकिन’ला सहा कोटी रुपये देऊनही ‘ससून’ला औषधपुरवठा नाही!…ससूनच्या अहवालातील धक्कादायक माहिती
त्यामुळे काँग्रेसमध्ये गटबाजी सुरू का? त्या प्रश्नावर नाना पटोले म्हणाले की, रविंद्र धंगेकर हे आजारी आहेत. त्यामुळे बैठकीला येऊ शकले नाही. पण मीडियाला आमची जास्त काळजी दिसत आहे. तुम्ही भाजपकडे बघा, काँग्रेसमध्ये कुठलीही गटबाजी नाही. जर गटबाजी राहिली असती तर आम्ही कसबा कसा जिंकलो असतो. कसब्याची जागा आम्ही जिकणार असं म्हटलं होतं आणि आम्ही जिंकून दाखविले. अशी भूमिका मांडत काँग्रेस पक्षातील अंतर्गत गटबाजीवर पडदा टाकण्याचा प्रयत्न त्यांनी केला.