महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. १४ आरोपींनी या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता. पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे. ३१ ऑगस्ट रोजी पुणे स्टेशनवरून अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी गावी जाण्यासाठी पुणे रेल्वे स्टेशन येथे गेली होती. तेव्हा तेथील एका रिक्षाचालकाने तिला विश्वासात घेत रिक्षात बसवलं आणि नंतर थेट एका खोलीत घेऊन गेला. तिथे तिच्यावर आठ जणांनी बलात्कार केला. त्यामध्ये सहा रिक्षाचालक आणि दोघे रेल्वेमधील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा समावेश होता. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे स्टेशन परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे, आठही आरोपींना काही तासात ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला.

आरोपींनी अल्पवयीन मुलीला वेगवेगळ्या ठिकाणी नेले आणि तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केला. पीडितेच्या वडिलांनी बेपत्ता मुलीची तक्रार दाखल केली तेव्हा ही बाब उघडकीस आली. १ सप्टेंबर रोजी तक्रार प्राप्त झाल्यानंतर मुलीचा शोध सुरू करण्यात आला. त्यानंतर पोलिसांकडून तिचा शोध घेण्यात आला. यानंतर सर्व आरोपींना अटकही करण्यात आली.

यानंतर आता १४ वर्षीय मुलीवर सामुहिक बलात्कार प्रकरणी बालहक्क आयोगाचे राज्य सरकारकडे यासंदर्भात अहवाल देण्याची सूचना केली आहे. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने पुण्यात १४ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याच्या अहवाला राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने स्वतःहून दखल घेतली आहे. पुणे पोलीस आयुक्तांना पीडितेची ओळख उघड होणार नाही याची खात्री करण्यासाठी चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत आणि कारवाईचा अहवाल ७ दिवसात पाठवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

पीडितेच्या जबाबानुसार, मुख्य आरोपीने त्याच्या एका मित्राला वाटेत रिक्षामध्ये बसवले. यानंतर दोघांनी तिला जबरदस्तीने एका निर्जन ठिकाणी नेले, जिथे तिच्यावर बलात्कार केला. मग त्याने त्याच्या मित्रांना बोलावून तिथे बोलावले. आरोपी तिला शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जात राहिला आणि तिच्यावर बलात्कार करत राहिला. आरोपीने तिला धमकी दिली की जर तिने कोणाला काही सांगितले तर तो तिला ठार मारेल. या प्रकरणी पोलिसांनी सोमवारी ८ आणि मंगळवारी ६ आरोपींना अटक केली. अशा प्रकारे सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.